22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeRatnagiriजिल्हयात १४ ग्रामपंचायत, १७१ रिक्त सदस्य ३ थेट सरपंचपदांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

जिल्हयात १४ ग्रामपंचायत, १७१ रिक्त सदस्य ३ थेट सरपंचपदांसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर अशा १४ सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्हयातील १४ सार्वत्रिक ग्रामपंचायती व १३४ ग्रामपंचायतीमधील १७१ रिक्तं सदस्य पदासाठी. तसेच ३ थेट सरपंच रिक्त पदासाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून ते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचार संहिता लागू राहील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे यांनी दिली. मंडणगड तालुक्यातील तोंडली, उन्हवरे आणि वाल्मिकीनगर, दापोली तालुक्यातील डौली, मांदिवली, ‘कवडोली आणि बांधतिवरे, चिपळूण तालुक्यातील कालुस्ते बु., कालुस्ते खु., व टेरव, गुहागर तालुक्यातील असगोली, संगमेश्वर तालुक्यातील ओझरे बु.व तळेकांटे, तर राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर अशा १४ सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर, नामनिर्दे शनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा वेळ १६ ते २० ऑक्टोबर, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजता, नामनिर्देशनपत्र छाननी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्दे शनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक बुधवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ बुधवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. नंतर, आवश्यक असल्यास मतदान रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत होऊन मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular