24.3 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

कमी बजेटमध्ये प्रचंड कमाई करणारा साऊथचा अप्रतिम सस्पेन्स चित्रपट…

आजकाल, ओटीटीवर ॲक्शन थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड...

चिपळूण पंचायत समितीने थकवले १ लाख २१ हजार…

मार्च महिना जवळ आला की, सर्व आस्थापनांना...

कोळकेवाडीतील खोदकामांमुळे वाड्यांना धोका – पाणी योजनेसाठी काम

कोळकेवाडी धरणातून सायफनद्वारे तालुक्यातील अडरे, अनारी परिसरातील...
HomeRatnagiriरत्नागिरी शहर पोलिसांच्या छाप्यात, गावठी दारूचा १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी शहर पोलिसांच्या छाप्यात, गावठी दारूचा १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

विदेशी दारूप्रमाणे गावठी दारूचा नशा सुद्धा अनेक जणांना असतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने अशा प्रकारे गावठी दारू तयार करून त्याची बेकायदेशीर रित्या विक्री केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीतील दांडेआडम येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारु तयार करण्याचे अड्डे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

शहर पोलीसांना या मुद्देमालाची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीसांनी हा छापा टाकून जप्त केलेला मुद्देमाल ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. कोल्हापूर येथून हे साहित्य आणण्यात आले होते. त्यानुसार पोलीसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल १४ लाखांचा गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये लागणारा मुख्य पदार्थ काळा गुळ,  नवसागर, साखर असे एकूण ९ लाखाचे साहित्य व ५ लाखांचा टेम्पो शहर पोलीसांनी टाकलेल्या धाडीत जप्त केला आहे.

रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. ही धाडीची कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. दांडेआडम येथे एका गोदामावर शहर पोलीसांनी छापा टाकून १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

तसेच जिल्ह्यात अजून कुठे कुठे या प्रकारची गावठी दारू बनवण्यासाठी मालाचा पुरवठा केला जात आहे का?  याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. गावठी दारूची भट्टी लावून दारू विकण्याचे अनेकांचे धंदे आहेत, परंतु, पोलिसांना काहीवेळा त्याचा मागमूसहि लागू देत नाहीत. एवढ्या छुप्या पद्धतीने हे बेकायदेशीर धंदे रात्रीच्या काळोखाचा फायदा उठवत केले जातात.

RELATED ARTICLES

Most Popular