25.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraमुंबई-गोवा जलप्रवास सेवा सुरु

मुंबई-गोवा जलप्रवास सेवा सुरु

साधारणतः भारतामध्ये एकूण १५८  क्रूझ पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

दि.१८ सप्टेंबरपासून मुंबई-गोवा जलमार्गावर लक्झरियस क्रूझ सेवा सुरु करण्यात येणार आहे. देशातील हे पहिले लक्झरियस क्रूझ असून त्यामुळे गोवा आणि मुंबईला नक्कीच पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

क्रूझ क्षेत्र सिंगापूर, दुबई, हाँगकाँग कॅरेबियन इत्यादी मोठ्या देशामध्ये आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ पर्यटनामध्ये भारताचा वाटा निम्या टक्कयावर आहे. साधारणतः भारतामध्ये एकूण १५८  क्रूझ पर्यटन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या संख्येमध्ये आत्ता वाढ होऊन ती ७०० पर्यत वाढली आहे. पर्यटकांचे आदराने स्वागत करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुंबई बंदरात ३०० कोटी खर्चून ४.१५ एकरामध्ये क्रूझ टर्मिनल उभे आहे.

येत्या १८  सप्टेंबरपासून मुंबईपासून गोवा, दीव, लक्षद्वीप, कोची  आणि श्रीलंका या ठिकाणी पर्यटकांसाठी क्रूझ सेवा सुरू होणार आहे. जलवाहतुकीद्वारे पर्यटक सेवेत कार्यरत असलेल्या कोर्डेलिया क्रूझ कंपनीशी आयआरसीटीसीने करार केल्याने अनेक पर्यटकांना उच्च दर्जाची जल वाहतुक अनुभवता येणार आहे. सध्या मुंबई-दीव-मुंबई, मुंबई-अॅटसी-मुंबई,  मुंबई-गोवा-मुंबई,  कोची-लक्षद्वीप अशा मार्गावरच हे जहाज जाणार आहे. त्यामुळे या सेवेमध्ये पर्यटकांना जहाजावरील अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ उठवता  येणार आहे. त्यामध्ये असणारे रेस्टॉरंट, ओपन थिएटर,  बार,  जीम,  मुलांसाठी लहान तलाव अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत.

आयआरसीटीसीने आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा देणाऱ्या कोर्डेलिया क्रूझ या खासगी कंपनीशी करार केला असून,  पहिल्या टप्प्यात ही कंपनी पहिली सेवा मुंबईमध्ये देत आहे. ती केवळ देशी पर्यटकांसीठी उपलब्ध असणार आहे. त्यानंतर मे २०२२ मध्ये हे लक्झरी जहाज तामिळनाडूमधील चेन्नई येथे स्थलांतर होणार असून, तेथून ते कोलंबो,  गॅले, जाफना व त्रिंकोमाली या श्रीलंकेतील ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवास करणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular