26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriपुणे आंबा महोत्सवात १९ कोटींची उलाढाल - बागायतदारांना मिळाली बाजारपेठ

पुणे आंबा महोत्सवात १९ कोटींची उलाढाल – बागायतदारांना मिळाली बाजारपेठ

यंदा हवामान बदलांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर घटले होते. या टंचाईतही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या पुण्यातील आंबा महोत्सवातून चोखंदळ ग्राहकांनी मोठ्याप्रमाणावर खरेदी केली. शेतकरी ते ग्राहक या उपक्रमाअंतर्गत झालेल्या महोत्सवातून सुमारे १९ कोटी रुपयांची उलाढाल झाली. यामधून खवय्यांना हापूसची चव चाखता आली आणि बागायतदारांना बाजारपेठ मिळाली. पणनतर्फे दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या आंबा महोत्सव १ एप्रिल ते ३ जून २०२३ दरम्यान मार्केट यार्डमधील जिल्हा परिषदेच्या जागेवर आयोजित केला होता. यामध्ये ६७ स्टॉलची उभारणी केली होती. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील केशर आंबा उत्पादक असे १०५ शेतकरी सहभागी झाले होते.

यंदा आंबा महोत्सवावर हवामान बदलाचे सावट असल्याने एप्रिलमध्ये महोत्सवाच्या प्रारंभाला आवक कमी राहिली. दरही ७०० ते १ हजार २०० रुपये राहिल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले. एप्रिलचा पूर्ण महिना हे दर कायम होते. त्यानंतर मे महिन्यामध्ये आवक सुरळीत होऊन, दर ५०० ते ७०० रुपये प्रति डझन राहिले. रत्नागिरी जिल्ह्यातून आवक सुरू झाल्यानंतर दर आवाक्यात आले. यावेळी दर ३०० ते ५०० रुपये डझन राहिला. महोत्सवामध्ये साधारण अडीच ते तीन लाख डझन आंबा विक्री झाली. यावेळी महोत्सवात सरासरी ७०० रुपये प्रति डझन विक्रीतून साधारण १९ कोटी रुपयांची उलाढाल झाली.

RELATED ARTICLES

Most Popular