26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedअल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी ताब्यात

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी ताब्यात

खेड तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणार्‍या युवकाला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.

सध्या लहान वयात पाल्यांना दिल्या गेलेल्या अति स्वातंत्र्यामुळे म्हणा किंवा व्यभिचारी वृत्ती वाढल्यामुळे अनके कठीण प्रसंगांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. हल्ली बलात्कार, समलैंगिक संबंध, खून, एकतर्फी प्रेम प्रकरण, नाईट ट्रीप अशा अनेक प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात ऐकिवात येत आहेत. पण पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचा काही ठिकाणी मुले गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अजाणतेपणाचा फायदा काही गुन्हेगार घेत असल्याचे सुद्धा पाहण्यात येत आहे.

खेड तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करणार्‍या युवकाला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. त्याची रवानगी न्यायालयाने ८ दिवसासाठी पोलिस कोठडीत केली आहे.

खाडीपट्ट्यातील एका गावातील चौदा वर्षीय मुलीच्या पोटात दुखायला लागले आणि वारंवार उलट्या होऊन तिला अशक्तपणा जाणवण्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला तिच्या आईने शहरातील एका दवाखान्यात वैद्यकीय तपासणीसाठी आणले. वैद्यकीय अधिकार्‍याने तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याची बाब समोर आली. या घटनेने पालकांची अवस्था भेदरल्यासारखी झाली.

या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने मुलीकडे याबाबत चौकशी केली असता, तिने घाबरून या सर्व प्रकाराची आणि त्या मुलाबद्दलची माहिती आईला दिली. माहिती मिळताच त्या मुलीच्या आईने तत्काळ पोलीस ठाणे गाठून, या सर्व प्रकाराची माहिती दिली.

पीडित मुलीच्या आईने खेड पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी संशयित युवका विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली व न्यायालयात हजर केले. न्यायलयाने या गुन्ह्याबद्दल ८ दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular