23 C
Ratnagiri
Wednesday, February 18, 2026

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...

चिपळुणात कुणाचा सभापती होणार? किंगमेकर शेखर निकमांच्या निर्णयाकडे लक्ष

चिपळुणात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने पंचायत...

एमआयडीसीतील मत्स्य उत्पादक कंपनीला दिड कोटींची गंडा

रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील 'मे. जिलानी मरीन...
HomeKhedदाभोळ खाडीच्या प्रदूषणावर संशोधन सुरू...

दाभोळ खाडीच्या प्रदूषणावर संशोधन सुरू…

या खाडीवर नदीकाठच्या मच्छीमारांचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून सुरू आहे.

येथील दाभोळ खाडीत वारंवार मासे मरण्याच्या घटना घडतात. त्यानंतर लोटे औद्योगिक वसाहतीमधून खाडीला दूषित पाणी सोडल्याचा आरोप होतो; मात्र आता या प्रदूषण प्रश्नाला वैज्ञानिक पहताळणीची जोड मिळणार आहे. लोटे एमआयडीसीमधील सीईटीपीमधून प्रक्रिया करून खाडीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मासे तसेच इतर सागरी जीवसृष्टीवर होणारा परिणाम तपासला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारत सरकारच्या बडोदा येथील सेंट्रल इनलॅन्ड फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटला अभ्यासाची जबाबदारी दिली असून, या पावसाळ्यात खाडीतील नमुने घेत या इन्स्टिट्यूटने संशोधन सुरू केले आहे. शहरातून गोवळकोट येथून सुरू होणारी ही खाडी दाभोळ येथे समुद्राला जाऊन मिळत आहे. चिपळूणसह गुहागर, खेड, दापोली अशा चार तालुक्यांत सामावलेल्या या खाडीवर नदीकाठच्या मच्छीमारांचा उदरनिर्वाह अनेक वर्षांपासून सुरू आहे.

लहान लहान होड्यांमधून मासेमारी करणे, हाच या परिसरातील कुटुंबांचा मुख्य व्यवसाय आहे; मात्र लोटे औद्योगिक वसाहतीतून १९९७ मध्ये झालेल्या रासायनिक प्रदूषणानंतर ही खाडी चर्चेत आली. कालांतराने लोटेतील सीईटीपीमध्ये मोठे बदल होत गेले. सीईटीपीच्या विस्तारीकरणाबरोबरच प्रदूषण नियंत्रणाच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही प्रदूषणाचा प्रश्न पूर्णपणे निकालात निघालेला नाही. खाडीत अधूनमधून मासे मरतुकडी होत असते. त्यामुळे या खाडीचा शास्त्रोक्त सव्र्व्हे करण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही महिन्यांपूर्वी घेतला.

केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असलेली सेंट्रल इनलँड फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूट ही एक प्रमुख मासेमारी संशोधन संस्था आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संस्थेला दाभोळखाडीचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार या संस्थेने पावसाळ्यादरम्यान दाभोळखाडीतील एकूण सहा ठिकाणचे पाणीनमुने गोळा करून प्राथमिक तपासणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular