22.7 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeDapoliदापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक, प्रवासी जखमी

दापोलीत दोन एसटी बसची समोरासमोर धडक, प्रवासी जखमी

जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या दापोलीमध्ये एसटीच्या दोन बसमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बोरीवली दापोली व दापोली मुरादपूर या दोन गाड्यांची धडक झाली यामध्ये अंदाजे २५ जण जखमी झाले असून त्यामध्ये जास्त करून कॉलेज व शाळकरी मुलांचा समावेश आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या घटनेत एका बसचा चालक गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात असून, इतर जखमींमध्ये २५ जणांचा समावेश असून, महिला आणि विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

दरम्यान, जखमींना उपचारासाठी जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणीतीही ठोस माहिती काही समजू शकलेली नाही. पण बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

छायाचित्रामध्ये अपघाताची भीषणता दिसून येते आहे. या बसने अनेक शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रवास करत असतात. त्यामुळे अपघाताच्या वृत्ताने अनेक पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना काही प्रमाणात दुखापत झाली असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. अनेक वेळा खराब रस्ते, वाढलेली झाडी त्यामुळे चालकांना समोरील रस्ता दिसणे देखील कठीण बनते. आणि अशा रस्त्यांवरून वाट काढताना चालकांच्या नाही नऊ येतात. दोन्ही गाड्यांचे चालक सुद्धा समोरूनच जोरदार धडक बसल्याने काही प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर देखील उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular