27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedलोटेतील ९ गावांसाठी पावणेदोन कोटी

लोटेतील ९ गावांसाठी पावणेदोन कोटी

९ प्रदूषणग्रस्त गावाअंतर्गत १३ विकासकामांसाठी १ कोटी ८४ लाख २२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ९ प्रदूषणग्रस्त गावाअंतर्गत १३ विकासकामांसाठी १ कोटी ८४ लाख २२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करत निविदा काढून लवकरात लवकर कामे सुरू करण्याच्या सूचनाही शिवसेना नेते रामदास कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अनेक वर्षांपासून लोटे गावातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत मंजूर झालेल्या कामांच्या प्रस्तावांची यादी तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्या माध्यमातून युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन काते व लोटे शिवसेना शाखाप्रमुख शैलेश चाळके यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे दिली होती. याबाबत सामंत यांनी मंजुरी केलेले पत्र जोडण्यात आले आहे. तसेच अंदाजपत्रक तयार करून निविदा काढून लवकरात लवकर कामे सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशही देण्यात आले आहेत.

लोटे-सुप्रिया केमिकल्सते दत्तवाडी- विठ्ठलवाडी रस्ता डांबरीकरणासाठी ३० लाख ५ हजार, लोटे-आत्माराम चाळके ते अंकुश चाळके विठ्ठलवाडी यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण ४ लाख ५२ हजार, लोटे गावठाण बौद्धवाडी ते अंगणवाडी रस्ता डांबरीकरण ६ लाख ३५ हजार, लोटेमाळ ते एमआयडीसी अॅप्रोच रस्ता डांबरीकरण २३ लाख ६९ हजार तर लोटे सुभाष कडू यांच्या दुकानापासून ते नितीन चाळके यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण १५ लाख १७ हजार, लोटे- अथर्व केमिकल्स ते तलारीवाडी रस्ता डांबरीकरण १७ लाख ४२ हजार, लोटे अथर्व केमिकल्स ते अनंत माने यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण ६ लाख ३७ हजार, लोटे- भारत ऑरगॅनिक ते कुळे घर ४ लाख ५२ हजार, लोटे- पटवर्धन दुकान ते संजय भालेकर यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण २४ लाख ३९ हजार, लोटे संभाजी चाळके ते सुभाष चाळके घरापर्यंत पाखाडी ९ लाख १८ हजार तसेच लोटे हनुमान मंदिर ते अशोक कंपनी पाखाडी १८ लाख ३७ हजार, लोटे संभाजी चाळके ते सुभाष चाळके घर बंदिस्त गटार ९ लाख १८ हजार, कोरेगाव मंदिर ने अशोक कंपनी संरक्षण भिंत १४ लाख ५३ हजार अशा १३ विकासकामांना १ कोटी ८४ लाख २२ हजाराचा निधी मंजूर झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular