चिपळूणकरांना विश्वासात घेऊन प्रशासन जी-जी कामे हाती घेईल त्याला हवा तेवढा निधी दिला जाईल. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी चिपळूणकरांना अपेक्षित असलेली २०० कोटींच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेला मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. शहरातील विविध भागातील महिन्यांपूर्वी दौरा केला होता, त्यावेळी ज्या विकासकापांना आपण निधी देऊ, असे आश्वासन दिले होते, ती सर्व विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होऊन आपल्याच हस्ते त्याचे उद्घाटन होत असल्याचे समाधान वाटते. राज्यातील महायुती सरकार विकासकामांबाबत गतिमान आहे.
चिपळूण नगरी ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. येथे सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमच सार्वजनिक कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वपक्षीय मतभेद विसरून एकत्र येतात. त्यामुळे चिपळूणला विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. आमदार शेखर निकम म्हणाले, शासनाच्या माध्यमातून चिपळूण शहरातील विकासकामांसाठी आजपर्यंत २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांनी वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ काढणे, पवन तलाव मैदान विकसीत करणे, वाशिष्ठी नदीवर शंकरवाडी येथील नलावडा बंधारा आदी कामांसाठी निधी देण्याची मागणी केली.