26.7 C
Ratnagiri
Wednesday, February 18, 2026

देवरूख व संगमेश्वर बाजारपेठेत ओले काजूगर दाखल, दर चढाच

कोकणात आंबा व काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात...

मोहर, फळगळतीमुळे बागायतदार हवालदिल

बदलत्या हवामानाच्या दुष्टचक्रातून अजून आंबा पीक सुटलेले...

मंडणगडमध्ये महामार्ग रुंदीकरणाचा पेच…

कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या...
HomeIndiaबेल्जियन चॉकलेटची गणपतीची २०० किलोची मूर्ती!

बेल्जियन चॉकलेटची गणपतीची २०० किलोची मूर्ती!

लुधियानातील एका बेकरने चक्क बेल्जियन चॉकलेटमधून बाप्पाची २०० किलोची मूर्ती साकारली आहे.

गणेशोत्सवाची सकारात्मकता राज्याबाहेरही सर्वत्र पाहायला मिळते. गणपतीला विशेष आवडणारे मोदक आपण विविध चवीचे, रंगाचे, आकाराचे सुद्धा आपण पाहतो. पण बाप्पाच जर वेगळ्या पद्धतीमध्ये बघायला मिळाला तर. वाचून नवल वाटले असेल, पण आपण शाडूच्या मातीचा, प्लास्टर ऑफ पॅरिस, इको फ्रेंडली बाप्पा बघतो, पण एका लुधियानामधील एका बेकरने बेल्जियन चॉकलेटमधून गणपतीची २०० किलोची मूर्ती तयार केली आहे.

अनेक राज्यांमध्ये गणेशउत्सव  विशेषत: महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, प. बंगाल, तेलंगणा, उत्तर प्रदेश येथे साजरा केला जातो. गणेश चतुर्थी हा उत्सव भारतीय बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सणांपैकी एक सण. याची सांगता १० दिवसांनी अनंत चतुर्दशीला होते. कुटुंब आणि मित्रमंडळींसह मोठ्या उत्साहात हा सण आनंदाने साजरा केला जातो. परंतु,  अशा मोठ्या प्रमाणावर उत्सवांचा पर्यावरणावर होणाऱ्या प्रभावाकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. रसायनमिश्रित , प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इतर पर्यावरणाला घातक ठरणारे घटक जे मूर्ती बनवताना वापरतात ते उत्सवाच्या शेवटी विनाशकारी मार्गाने सोडल्या जातात.

परंतु, आता लोकांचा कल हा पर्यावरणास अनुकूल अशा मूर्तीं बनविण्याकडे हळूहळू वाढत आहे आणि बरेच लोक पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू तसेच अन्न सामग्रीसह स्वतःच्या मूर्ती बनवत आहेत. सीडबॉल गणपती, इको फ्रेंडली गणपती या कल्पना लक्षात घेऊन, लुधियानातील एका बेकरने चक्क बेल्जियन चॉकलेटमधून बाप्पाची २०० किलोची मूर्ती साकारली आहे.

बेकर असलेल्या हरजिंदरसिंग कुकरेजा यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, गणपतीची खाद्य मूर्ती साकारण्यासाठी १०  शेफला १० दिवस लागले. परंतु, या चॉकलेटच्या मूर्तीमागील पवित्र आणि उदात्त विचारांनी सगळ्यांची मने जिंकली. त्यांनी सांगितले कि, आम्ही मूर्तीचे विसर्जन पाण्यात करणार नाही तर आम्ही दुधात विसर्जन करणार आणि झोपडपट्टीतील मुलांना प्रसाद म्हणून चॉकलेट दुधाचे वाटप करण्याची योजना आखत आहोत.

RELATED ARTICLES

Most Popular