25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriदोन महिन्यांत जिल्ह्यात २४ डेंगीबाधित रुग्ण, आरोग्य विभाग सतर्क

दोन महिन्यांत जिल्ह्यात २४ डेंगीबाधित रुग्ण, आरोग्य विभाग सतर्क

डेंग्यू हा संसर्गजन्य रोग असून एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. राज्यात सर्वत्रच या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.

ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला असून डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत जिल्ह्यात २४ बाधित रुग्ण आढळले आहेत तर खेड शहरात सुमारे २५ संशयित डेंग्यूबाधित असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. पावसाचा जोर ओसरला असून, श्रावणधारा सुरू झाल्या आहेत. गेल्या चार दिवसात एखादी सर दिवसातून पडून जात आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचून राहत आहे.  रात्री पाऊस आणि दिवसा ऊन अशी स्थिती जिल्ह्यात सर्वत्र आहे. पाणी साचून राहिलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते.

डेंग्यू हा संसर्गजन्य रोग असून एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. राज्यात सर्वत्रच या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात १६ तर जुलै महिन्यात ८ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर मलेरियाचा जुलै महिन्यात १ रुग्ण सापडला होता. डेंग्यूचे रुग्ण सापडू लागल्यानंतर आरोग्य विभागाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बराच काळ पाणी साचून राहत असलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खेड येथील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या एक महिन्यापासून डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत.

आतापर्यंत सुमारे २५ जणांची नोंद झाली आहे. ते येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. डेंग्यूची साथ आटोक्यात आणावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पालिकेला इशारा देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने खेड शहरात १७ पथके सर्व्हेक्षणासाठी नेमली. आजारी रुग्णाची शोधमोहीम राबवण्यात आली आहे. आजारी रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी जिल्हा रुग्णालयात मागवण्यात आले आहेत. सध्या खेड शहरामधील पूरग्रस्त भागात धूर फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular