22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriहातखंबा येथे गोवा बनावटीचा विदेशी दारू साठा जप्त, एकाला अटक

हातखंबा येथे गोवा बनावटीचा विदेशी दारू साठा जप्त, एकाला अटक

इतर राज्यांपेक्षा गोवा राज्यामध्ये दारूच्या किमती बऱ्याच प्रमाणामध्ये कमी आहेत. त्यामुळे अनेक राज्यातून चोरीछुपे मद्याची वाहतूक आणि विक्री केली जाते. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणहून विविध प्रकारच्या मद्य प्रकारांना विशेष मागणी असते. त्यामुळे पोलीस सतर्क राहून मिळालेल्या खबरीवरून माग काढून आरोपींना शिताफीने पकडत आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे गोवा बनावटीची २४ लाख ९३ हजाराची विदेशी दारू जप्त करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करून बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीची विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे.

हि वाहतूक मुदत संपलेल्या आणि आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या औषध साठ्यामध्ये लपवून बेकायदेशीरपणे केली  जात होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळीच सापळा रचून, या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये गोवा बनावटीची तब्बल २४ लाख ९३ हजाराची विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी एकाला अटक केली असून सर्व मुद्देमालासह वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. संशयिताला न्यायालयातने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. गोविंद जयराम वराडकर रा. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तालुक्यातील हातखंबा येथील मुख्य रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

मागील २ वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्याने, त्यानंतर येणाऱ्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण जोमाने तयारीला लागले आहेत. त्यामध्ये अनेक हॉटेल्स, ओपन हॉल्स विविध प्रकारे सेलिब्रेशन करण्यासाठी विविध प्रकारच्या पदार्थांची, विविध पेयांची रेलचेल असते. त्यामुळे नक्की हा पकडलेला माल कुठे पोहोचविण्यात येत होता त्याबद्दल पोलीस चौकशी करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular