24.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeRatnagiriपनवेल-चिपळूण दरम्यान दिवाळीसाठी धावणार रेल्वेच्या २४ जादा गाड्या

पनवेल-चिपळूण दरम्यान दिवाळीसाठी धावणार रेल्वेच्या २४ जादा गाड्या

अनारक्षित रेल्वेगाड्यांचे तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे काढता येईल.

येत्या दिवाळीनिमित्तः प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून ३० अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी पनवेल चिपळूणदरम्यान २४ रेल्वेगाड्या आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मडगावदरम्यान ६ रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित पनवेल – चिपळूण विशेष रेल्वेगाडी ३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी पनवेल येथून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी रात्री ९.५५ वाजता पोहोचेलं. गाडी क्रमांक ०११६०. अनारक्षित चिपळूण पनवेल विशेष रेल्वेगाडी ३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी चिपळूण येथून सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी दुपारी ४.१० वाजता पोहोचेल. ही विशेष रेल्वेगाडी सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रु‌क, खेड आणि अंजनी या स्थानकात थांबेल.

या रेल्वेगाडीला ८ मेमू डबे असतील. गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ६ ते २० ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी म्हणजे ६, १३ आणि २० ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून संकाळी ८.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी रात्री १०:४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१००४ म डगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान दर रविवारी म्हणजे ५, १२ आणि १९ रोजी मडगाव येथून दुपारी ४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सकाळी ६.२० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, म ाणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवंली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी येथे थांबा असेल.

या रेल्वेगाडीला एक वातानुकूलित द्वितीय, ३ वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय वर्ग, १ द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन असेल. विशेष गाडी क्रमांक ०१००३. साठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर, आयआरसीटीसी या संकेतस्थळावर खुले झाले आहे. तसेच अनारक्षित रेल्वेगाड्यांचे तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे काढता येईल. या तिकिटांसाठी सामान्य अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसारखे शुल्क लागू असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

RELATED ARTICLES

Most Popular