20.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriदेवधेत २० लाखांचे २४ टन खैर जप्त…

देवधेत २० लाखांचे २४ टन खैर जप्त…

या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ठाणे युनिटने काल (ता. २४) लांजा तालुक्यातील देवधे येथील ग्रीन वेव्ह अॅग्रो कंपनीवर छापा टाकून खैर लाकडांच्या तस्करीसाठीचा मोठा साठा उघडकीस आणला. या कारवाईत २४ टन खैर लाकडाचे ओंडके आणि तस्करीसाठी वापरला जाणारा एक ट्रक जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २६ लाख ४० हजार रुपये इतकी आहे. दहशतवाद विरोधी पथकाने थेट लांज्यात येऊन ही मोठी कारवाई केल्याने खैर तस्करीचा दहशतवादाशी संबंध आहे का? याबाबतची चाचपणी सुरू आहे. एटीएस, ठाणे युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लांजा येथील देवधे गावातील गट नं. ४४८, येथील ग्रीन वेव्ह अॅग्रो कंपनीच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात सुमारे ७ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ९ टन खैर लाकडाचे ऑडके आणि ६ लाख रुपये किमतीचा जुना ट्रक आढळला.

याशिवाय, कंपनीच्या आवारात १२ लाख ७५ हजार रुपये किमतीचे १५ टन खैर लाकडाचे ऑडकेही बेकायदेशीररीत्या साठवलेले आढळले. या प्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यादरम्यान घटनास्थळावरून कारखाना चालक इम्तियाज कमल बरमारे (वय ५३, रा. साई समर्थ कॉम्प्लेक्स, ता. लांजा, रत्नागिरी) आणि ट्रक चालक सुफियान युसूफ नाचण (वय ४९, रा. बोरीवली बसस्टॉप, भिवंडी, ठाणे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त केलेला मुद्देमाल हा वाहतुकीसाठी अवजड असल्याने तो सध्या वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मुद्देमाल वनखात्याच्या ताब्यात – ठाणे येथील एटीएसच्या पथकाने लांज्यात येऊन २४ टन खैर जप्त केले. खैर तस्करीच्या मागे दहशतवादाशी काही संबंध आहे का ? याचीही चाचपणी सुरू असल्याचे समजते. जप्त केलेला मुद्देमाल वाहतुकीसाठी अवजड असल्याने सध्या तो वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular