25.4 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeRatnagiriरत्नागिरीत २५, सिंधुदुर्गात ३४ कोटींचे वीजबिल थकीत

रत्नागिरीत २५, सिंधुदुर्गात ३४ कोटींचे वीजबिल थकीत

कोकण परिमंडळस्तरीय अधिकाऱ्यांचे विशेष वसुली पथक कार्यरत आहे.

जिल्ह्यात ९७ हजार ९६५ ग्राहकांकडे २५ कोटी रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९४ हजार ७७४ ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये वीजबिल ‘थकले आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकी वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. कोकण परिमंडळस्तरीय अधिकाऱ्यांचे विशेष वसुली पथक कार्यरत आहे. तरी थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडितची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ७४ हजार ५२२ घरगुती ग्राहकांकडे ८ कोटी ५९ लाख, वाणिज्यक ७ हजार ३१८ ग्राहकांकडे २ कोटी औद्योगिक ७६१ ९९ लाख, ग्राहकांकडे १ कोटी ५४ लाख, कृषी १० हजार २१९ ग्राहकांकडे २ कोटी ३८ लाख, पथदिवे १५६९ ग्राहकांकडे ५ कोटी ३२ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा ११६४ ग्राहकांकडे २ कोटी ७० लाख, सार्वजनिक सेवा २२६६ ग्राहकांकडे १ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६२ हजार ३८१ घरगुती ग्राहकांकडे १० कोटी १५ लाख, वाणिज्यिक ६ हजार ५०५ ग्राहकांकडे ३ कोटी ६१ लाख, औद्योगिक १०६५ ग्राहकांकडे २ कोटी ४६ लाख, कृषी १९ हजार ११ ग्राहकांकडे ४ कोटी ९० लाख, पथदिवे २३९५ ग्राहकांकडे ८ कोटी ४२ लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा १२०९ ग्राहकांकडे ३ कोटी ५३ लाख, सार्वजनिक सेवा १८८४ ग्राहकांकडे ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे.

बिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू – दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकित वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकित असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular