25.6 C
Ratnagiri
Wednesday, July 23, 2025

सर्व विभागांची माहिती एका क्लिकवर, डॅशबोर्ड बनवण्याचे आदेश

सर्वसामान्य जनतेच्या मागणीपत्रावर काय कार्यवाही आणि किती...

अखेर राजापुरात मच्छी मार्केटमध्ये मासे विक्री

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर मासे विक्री करण्याऐवजी...

अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करा – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून, विशेषतः बीएलओ (बूथ...
HomeRatnagiriगणेशोत्सवात रत्नागिरीतून २५०० जादा बस...

गणेशोत्सवात रत्नागिरीतून २५०० जादा बस…

महामंडळाच्या एमएसआरटसी बस रिझव्हेंशन अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे.

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यासाठी मुंबईकर चाकरमान्यांना घेऊन ५ हजार जादा एसटी बस कोकणात येणार आहेत. गावी आलेल्या मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुलभ व्हावा म्हणून रत्नागिरी विभागाकडून २ हजार ५०० जादा गाड्यांचे नियोजन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या बसचे ग्रुप बुकिंगचे आरक्षण २२ जुलैपासून सुरू होणार आहे. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून कोकणासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. महिलांसाठी व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के तर ७५ वर्षावरील अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटदरात १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. बस आरक्षणासाठी npublic.msrtors. com. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. संबंधित बसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या एमएसआरटसी बस रिझव्हेंशन अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक, बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, तसेच कोकणातील महामार्गावर वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहे. मुंबईहून येणाऱ्या बसचालकांना मार्ग दिशादर्शनासाठी खास पथक कार्यरत राहणार आहे. दरम्यान, गतवर्षी मुंचईहुन ४ हजार ३०० बस कोकणात आल्या होत्या. यावर्षी ५ हजार गाड्या कोकणात पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी विभागातून गतवर्षी परतीसाठी २ हजार २०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यावर्षों २ हजार ५०० गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. गौरी गणपती विसर्जन २ सप्टेंबरला असल्याने त्या दिवसापासून परतीच्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून कोकणासाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular