भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली…

75

भिवंडी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे.वळ ग्रामपंचायत हद्दीत वळपाडा येथे इमारत कोसळली. संपूर्ण इमारत भुईसपाट झाली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२ रहिवासी दबले होते. तर या दुर्घटनेत ४ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथे शनिवारी दुपारी ही इमारत कोसळली. भिवंडीतील वर्धमान इमारत नावाची कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २२जण दबल्याची माहिती समोर आली असून ११ जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. कोसळलेली इमारत ही तीन मजली होती. इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

भिवंडी येथे पडलेल्या वर्धमान इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ११ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. भिवंडीची दुर्घटना घडल्यानंतर या इमारतीच्या ठिकाणी एनडीआरएफ टीम देखील दाखल झाली आहे. तर टीडीआरएफ जवानांकडून आतापर्यंत अर्धा तासांत ५ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.