30.6 C
Ratnagiri
Friday, December 19, 2025

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार विशेष गाडया

ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या...

बेकायदेशीर वाळू उपसा होताना दिसल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी आक्रमक

बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत आलेल्या तक्रारीवरून आम्ही संगमेश्वरमध्ये...

रत्नागिरी शहरात भरवस्तीत बिबट्याच्या संचाराने घबराट

रत्नागिरी शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि रहिवासी भाग...
HomeRatnagiriतीन वर्षांच्या चिमुकलीचा, विंचू दंशाने मृत्यू

तीन वर्षांच्या चिमुकलीचा, विंचू दंशाने मृत्यू

दिया अचानक रडायला लागल्याने तिला विंचू दंश झाल्याचे घरच्यांना तात्काळ लक्षात आले.

कोकणामध्ये विंचू व इंगळी दंशाचे प्रमाण पुर्वी जास्त होते. वस्ती वाढत चालल्याने आता त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. पण यावर उतारा देणारी औषधही उपलब्ध असल्याने अनेकांचे जीव वाचले आहेत. माजी आमदार डॉ. तात्यासाहेब नातू यांनी यावर अभ्यास करून ही लस शोधण्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. पण दुर्दैवाने संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथील ३ वर्षांच्या चिमुकलीला विंचू चावल्याने त्यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच दिया प्रवीण गुरव वय वर्ष ३ रा. बुरंबाड गुरववाडी या परिसरात राहणाऱ्या या मुलीबाबत धक्कादायक व दुर्देवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिया हिला दि.२८ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वा च्या सुमारास घरी खेळत असताना तिने घराच्या दरवाज्याच्या चौकटीवर हात ठेवला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. दरवाज्यावर असलेल्या विंचवाने तिच्या उजव्या हाताला दंश केला.

दिया अचानक रडायला लागल्याने तिला विंचू दंश झाल्याचे घरच्यांना तात्काळ लक्षात आले. तिच्यावर घरच्यांनी तात्काळ गावठी औषधोपचार केले होते. पण तिला पुन्हा २९ ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी ०७.३० वा. चे सुमारास तिला उलट्या होवुन तिच्या तोंडातून लाळ गळू लागली. तिची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे तिला जवळच असलेल्या खाजगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. यावेळी तिला डॉक्टरांनी तपासून तात्काळ पुढील उपचाराकरीता वालावलकर हॉस्पिटल चिपळूण येथे हलवण्यास सांगितले.

डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल चिपळूण येथे तिला दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर औषधोपचार चालू असताना तिचा काही वेळाने त्याच दिवशी सकाळी दहा वाजताच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून बुधवारी या घटनेची माहिती देण्यात आली आहे. विजय भिकाजी गुरव यांनी याची खबर संगमेश्वर पोलिसांना दिली आहे. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular