27.9 C
Ratnagiri
Monday, September 26, 2022

आमदार योगेश कदम यांना मिळणार मंत्रिमंडळात संधी…!

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसेनेमध्ये झालेल्या उलथापालथी...

खेड तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन खात्याच्या १७ दवाखान्यांची स्थिती बिकट

राज्यात सध्या जनावरांवर लंपी त्वचा रोगाचा फैलाव...

नवरात्रीचे औचित्य साधून, महिलांसाठी एक खास अभियान

आज २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला...
HomeRatnagiriरिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे महाराजा...! गणपतीला विशेष साकडे

रिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे महाराजा…! गणपतीला विशेष साकडे

आता एकच जिद्द रिफायनरी रद्द, 'रिफायनरी हटवा कोकण वाचवा' गणपती बाप्पा मोरया' या गजरात घोषणा देत दीड दिवसांच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीत निरोप देण्यात आला.

प्रत्येक गणेशोत्सवातून काहीतरी सामाजिक संदेश देत सणांमध्ये प्रबोधन करण्याची परंपरा आजही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे करत असल्याचे दिसते. परंतु, यंदा घरगुती स्तरावरील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करताना देखाव्यांमधून माहिती, सामाजिक विषयांची मांडणी केली जाते. कोकणातील राजापूर गोवळ येथील पंचक्रोशीत एक आगळावेगळा प्रयोग केला जात आहे.

कोकणातील राजापूर पट्ट्यातील २०गावांमध्ये वाड्यांवर, घरांमध्ये रिफायनरीविरोधातील बॅनर लावण्यात आले आहेत. काही घरांमध्ये रिफायनरीविरोधी देखावे आहेत, तर काही घरांमध्ये यासंदर्भातील घोषणा, पोस्टर बनवून लावण्यात आले आहेत. तर, कोकणातला रिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे महाराजा! असे गाऱ्हाणे राजापूर गोवळ पंचक्रोशीतील नागरिकांनी गणरायाला घातले.

रिफायनरी प्रकल्प हद्दपार कर रे… देवा महाराजा असे साकडे कोकणातील राजापूर रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटकांनी थेट बाप्पाला घातले आहे. यासाठी आता रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत निरोप देताना थेट गणपती बाप्पाला साकडे घातले. यावरून आता परिसरातून राजापूर रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटनांनी आपला विरोध कायमच असल्याचे गणेशोत्सवात स्पष्टपणे जाहीर केले आहे.

हे देवा महाराजा सालाबादप्रमाणे या वर्षीही तुझं आगमन होऊन तुझं आज वसर्जन होतं आहे. आमचो गोवळ गाव गेल्या पाचशे वर्षांपासूनचा हा का त्याच्या आधीपासूनच तुझो आगमन आमच्या गावात होता का? हा आमच्या पूर्वजांका माहीती. पण आज ह्या तुझ्या गोवळ गावाक रिफायनरीचो भूत येऊन बसता आणि हा भूत एवढा महाकाय असा की त्याचा एवढा समर्थान होता आणि आम्ही आज या पाच गावातील लोका जो काय विरोध करतो हव त्या विरोधाक तू तुझ्या कृपेने मान्य करून घे आणी या पंचक्रोशीतून हा रिफायनरी प्रकल्प हद्दपार करेंरे असा तुका आम्ही साकडं घालतो आणि आमच्या मागणा मान्य कर रे…देवा महाराजा, असे साकडे श्री गणरायाच्या चरणी राजापूर बारसू पंचक्रोशी परिसरातील रिफायनरी विरोधात असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी घातले.

गणरायाला साकडे घालून झाल्यावर ‘आता एकच जिद्द रिफायनरी रद्द, ‘रिफायनरी हटवा कोकण वाचवा’ गणपती बाप्पा मोरया’ या गजरात घोषणा देत दीड दिवसांच्या गणपतींना विसर्जन मिरवणुकीत निरोप देण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular