मकरसंक्रांतीच्या मुहूतविर गुहागर समुद्रकिनारी संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून ३३ कासव पिलांचा जन्म झाला असून, ही पिल्ले समुद्रात झेपावली. गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात कासव अंड्यांचे संरक्षण केले जात आहे. समुद्रकिनारी ६ कासव अंडी उबवणी केंद्र उभारण्यात आली असून, संवर्धनासाठी ११ कासवमित्रांची नेमणूक केली आहे. गुहागर किनारी ऑलिव्ह रिडले या जातीचे मादी कासव अंडी घालण्यासाठी हजेरी लावत आहेत. पाऊस थांबल्यानंतर कासवविणींचा हंगाम सुरू झाला. १७नोव्हेंबर २०२५ला गुहागरमध्ये १२८ अंड्यांचे पहिले घरटे सापडले होते. ही अंडी संरक्षित करण्यात आली होती. या अंड्यांमधून ३३ पिलांचा जन्म बुधवारी मंकर संक्रातीच्या मुहूर्तावर झाला.
दक्षिण कोकण कांदळवन विभाग विभागीय वनाधिकारी कांचन पवार, रत्नागिरी कांदळवन वनपरिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, गुहागरचे वनपाल अमित निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, कासवमित्र संजय भोसले व त्यांची ११ कासवमित्रांची टीम कासव संवर्धनाचे काम करत आहे. बुधवारी जन्मलेल्या ३३ पिलांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्यात आले. पिल्ले समुद्रामध्ये सोडताना वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, अभियंता मंदार छत्रे, संजय भोसले, शार्दुल तोडणकर, साहिल तोडणकर उपस्थित होते.

