26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeChiplunचिपळूणच्या टोईंग व्हॅनने ठोकरले महामार्गावरील अपघातात ४ ठार

चिपळूणच्या टोईंग व्हॅनने ठोकरले महामार्गावरील अपघातात ४ ठार

स्कॉर्पिओ मधून महाड शहरातील ८ जण लोणेरे येथे कॉफी पिण्यासाठी जात होते.

रायगड जिल्ह्यातील महाड शहरापासून दहा किलोमीटरवर अंतर असणाऱ्या वीर रेल्वे स्थानकासमोर मुंबई-गोवा महामार्गावरील फ्लाय ओव्हर पुलावर भीषण अपघात घडला. पुलावर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओला चिपळूणहून आलेल्या टोइंग व्हॅनची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघाताम ध्ये तर २ ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरूवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्कॉर्पिओ मधून महाड शहरातील ८ जण लोणेरे येथे कॉफी पिण्यासाठी जात होते. त्यांच्या गाडीमधील डिझेल संपल्याने त्यांनी आपली गाडी मुंबई- गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्थानकासमोरच्या फ्लायओव्हरवर रस्त्याच्या एका बाजूला सुरक्षित जागेवर उभी केली. तेवढ्यात मागील बाजूने चिपळूण ते पनवेल जाणाऱ्या भरधाव वेगातील टोइंग व्हॅनने जोरदार धडक दिली.

चौघांचा मृत्यू – या भीषण अपघातामध्ये पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, प्रसाद रघुनाथ नातेकर (वय २५, रा. कुंभार अळी महाड), सूर्यकांत सखाराम मोरे (रा. महाड) आणि साहिल नथुराम शेलार (वय २५, रा. कुंभारअळी महाड), समीर सुधीर मिंडे (रा. दासगाव ता. महाड) या चौघांचा मृत्यू झाला. तसेच सुरज अशोक नलावडे (वय ३४, रा. चांभार खिंड, ता. महाड) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी म बई येथे पाठविण्यात आले आहे. शुभम राजेंद्र साटल (वय २७ रा. शिरगाव, ता. महाड) या तरुणावर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

खड्ड्यात कोसळली – हा अपघात मुंबई गोवा मार्गावरून वीर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या अप्रोच रोड जवळ झाला. व्हॅनने दिलेली धडक एवढी प्रचंड होती की, त्या धडकेमुळे स्कॉर्पिओ सुमारे १०० फुटापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या एका खड्ड्यामध्ये कोसळली. या अपघाताचे वृत्त समजतात महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एस जाधव घटनास्थळी दाखल झाले. व्हॅन च्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून भा.न्या. संहिता १०६ (१),२८१,१२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वा.का. १८४ प्रमाणे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular