27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

आंजर्ले किनाऱ्यावर प्लास्टिकसह काळपट द्रव…

दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाकरिता परंपरेप्रमाणे ग्रामस्थ आंजर्ले...

‘एमआयडीसी हद्दपार’चे झळकले फलक, वाटदवासीयांचे गणरायाला साकडे

एमआयडीसी हद्दपार करा, असे फलक वाटद पंचक्रोशीतील...

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी,...
HomeRajapurराजापुरात ५ वेळा पूर, कायम स्वरूपी उपाय करण्याची मागणी

राजापुरात ५ वेळा पूर, कायम स्वरूपी उपाय करण्याची मागणी

राजापूरकरांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार कायम आहे.

गेल्या २ महिन्यात ५ वेळा राजापूर शहराला पूराच्या पाण्याने वेढा दिल्याने पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी काहीतरी परमनंट उपाय शोधायला हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून किमान ५ वेळा पुराच्या पाण्याने राजापूर शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. गाळ उपसा केल्यानंतरही राजापूरची पूर समस्या कायम आहे. त्यातच शासनाच्या पाटबंधारे विभागाने दोन वर्षापूर्वी शहराच्या पूररेषेत वाढ केल्याने आता या पूररेषाम क्तीतून व पूरमुक्तीतून सुटका होण्यासाठी संपूर्ण राजापूर शहराचे स्थलांतर हा एकमेव पर्याय ठरणार आहे. साधारणतः १८७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्यानंतर राजापूर बंदरात येणारी जहाजे येणे बंद झाले व राजापूरच्या वैभवाला उतरती कळा लागली.

तेव्हापासून राजापूर आणि पूर हे समीकरण बनत गेले आहे ते आजतागायत तसेच आहे. मात्र, १९८३ साली आलेल्या महापुराने राजापूर शहर जलमय झाले व शासनाने राजापूर शहरात पूररेषा अस्तित्त्वात आणली.  शासनाने लागू केलेली पूररेषा राजापूर नगर परिषदेने १९९३ साली स्वीकारल्यानंतर शहरातील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन शहराजवळील कोदवली ग्रामपंचायत हद्दीत करण्यात आले. मात्र, हे पुनर्वसन पूर्णतः अयशस्वी ठरले आहे. गतवर्षी राजापूर शहरातून वाहणाऱ्या कोदवलीसह अर्जुना नदीपात्रातील गाळ उपसा झाल्यानंतर पुराची तीव्रता कमी होईल, असे वाटत होते.

गेल्या दोन महिन्यांच्या काळात राजापूर शहरात आजपर्यंत पाच वेळा पुराचे पाणी शिरून शहरवासीयांना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पावसाचा जोर वाढला की कोदवली व अर्जुना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते आणि पुराचे पाणी शहरात शिरते. शहरात पाणी शिरले की शहरवासीयांना व्यापाराबरोबर अन्य वैयक्तिक नुकसानाला सामोरे जावे लागते. शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्था व जनजीवन पुरामुळे विस्कळीत होते. त्यामुळे या पूरसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी गेल्या अनेक दशकांपासून करण्यात येत आहे. मात्र, या मागणीची पूर्तता न केल्याने अजूनही राजापूरकरांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार कायम आहे.

वाढता धोका – पावसाचा जोर वाढताच अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होते. जुलै महिन्यात पाच वेळा नदीचे पाणी शहरात शिरले होते. शनिवारी (२७ रोजी) अर्जुना नदीची पाणी पातळी ५.४० मीटरपर्यंत पोहोचली होती. इशारा पातळीच्या वर पाणी पातळी पोहोचल्याने शहरातील जवाहर चौकात पाणी आले होते.

RELATED ARTICLES

Most Popular