मंडणगड येथे नव्याने निर्माण होणाऱ्या न्यायालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिशिल्पाला ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजनमधून दिला जाईल. त्याचबरोबर मूळगाव आंबडवे येथे स्मारक करण्याचा निर्णय घेतला असून २ वर्षांत त्याचे लोकार्पण करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मंडणगड न्यायालय उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मंत्री सामंत पुढे म्हणाले, ‘आजचा दिवस हा रत्नागिरीकरांसाठी अभिमान वाटावा असा दिवस आहे.
न्यायालयाच्या उद्घाटनानिमित्त घटनाकारांच्या तालुक्यात घटनेचा सांभाळ करणारे सर्वच घटक आजू उपस्थित आहेत ही विशेष बाब आहे. न्यायिक व्यवस्था चांगल असेल आणि त्याच्यासोबत राज्यकर्ते. राहिले तर खऱ्या अर्थानि न्याय या यंत्रणेला दिला जातो.’सरकारच्या माध्यमातून यावर्षी पहिल्यांदा आंबडवे येथे शासनाच्या वतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री म्हणून बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत- काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.