26.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiri'शासन आपल्या दारी'तून ५२ कोटी रुपयांचे वाटपे

‘शासन आपल्या दारी’तून ५२ कोटी रुपयांचे वाटपे

उत्पन्न वाढविण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया वित्तसहाय्य योजनेंतर्गत एकूण १२८ उद्योग सुरू करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली असून सुमारे १ लाख ६२ हजार ८४५ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ आणि सेवांचे वितरण केले आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना सुमारे ५२ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती शासनस्तरावरील कामे यांची 150007 ₹500 स्थानिक पातळीवरच मार्गी लागावीत, त्यांना विविध योजनांचे देय लाभ मिळावेत.

त्यांना शासकीय कार्यालयात एकाच कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागू नये, हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानातून शासन थेट जनतेच्या दारी पोहोचले. या माध्यमातून १७ विभागांचे विविध प्रकारचे लाभ वितरीत करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, अधिवाससह विविध दाखले, शिधापत्रिकाविषयीची कागदपत्रे, जात प्रमाणपत्र, आरोग्य तपासणी, कृषीविषयक नोंदी, शेती किंवा फवारणी कीट, विविध योजनांचे लाभ, निवडणूक विषयक नोंदणी, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन आणि योजनांचा लाभ, घरकुल योजनांचा लाभ, या अभियानात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

उत्पन्न वाढविण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया वित्तसहाय्य योजनेंतर्गत एकूण १२८ उद्योग सुरू करण्यात आले. त्यासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचे अनुदान वाटप केले. त्यात प्रामुख्याने काजू व आंबा प्रक्रियांचा समावेश आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत २ हजार ५२५ लाभार्थ्यांना विविध कृषी यंत्रासाठी ५ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान दिले. ज्यामध्ये पॉवरविडर व गवत कापणी यंत्राचा समावेश आहे. सिंधुरत्न योजनेंतर्गत २० इन्सुलेटेड वाहने, मच्छीमार महिलांसाठी १२ शीतपेटी व ई-स्कुटर, तसेच ९ उद्योजकांना १ कोटी ६० लाख २८ हजार ३६६ अनुदान मंजूर करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular