22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeMaharashtraगृह विभागाचा पोलीस विभागासाठी मोठा निर्णय

गृह विभागाचा पोलीस विभागासाठी मोठा निर्णय

समाजाची सुरक्षा करणारे असुरक्षित होऊ नये, यासाठी गृह विभागाने हा मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

देशभरात आणि राज्यात कोरोनाच्या संक्रमित आकडेवारीमध्ये कमालीची वाढ होत आहे. कोरोनाच्या नवीन विषाणू ओमायक्रॉनमुळे वाढ होत असून देशात कोरोना साथीची तिसरी लाट आली आहे असे काही अंशी जाहीर करण्यात आले आहे. कोणताही कार्यक्रम असो वा बंदी असो, सर्व परिस्थितीत फ्रंटवर काम करण्यासाठी पोलीस कायमच सज्ज असतात. त्यामुळे अनेक पोलिसांच्या जीवावर सुद्धा या गोष्टी बेततात.

पोलिसांच्या आरोग्याचा विचार करत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना देखील वर्क फ्रॉम करता येणार असल्याचे जाहीर केले आहे. आज पोलीस खात्यातील बहुसंख्य पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात गुंतले आहेत. त्यामुळे ५५ वर्षावरील पोलिसांना घरून काम करण्याचा आदेश जाहीर करण्यात आला आहे.

५५ वर्षांवरील पोलिसांनी ड्युटीवर प्रत्यक्ष हजर न राहता घरून काम करायचं आहे. तसेच संक्रमित पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. अनेक पोलिसांना सह्व्याधी देखील आहेत. त्यामुळे अशा कर्मचार्यांना कोरोना सारख्या काळात फ्रंटवर काम करणे धोक्याचे ठरणार आहे.

‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद पाळून काम करत असलेल्या पोलिसांना कोरोना,  नैसर्गिक संकट, मोर्चे, बंदी, दंगल, पाऊस, वादळ आणि अन्य कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात सवलत मिळत नसते. मात्र पोलिसांच्या आरोग्याचा सहानभूतीपूर्वक  विचार करत गृहमंत्र्यांनी उत्कृष्ट निर्णय घेतला आहे. ५५  वर्षांवरील पोलीस घरून नेमके कसे आणि काय काम करतील याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या निर्णयाचे पोलिसांकडून स्वागत केले जात आहे. समाजाची सुरक्षा करणारे असुरक्षित होऊ नये, यासाठी गृह विभागाने हा मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

RELATED ARTICLES

Most Popular