26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeChiplunऐन दिवाळीत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

ऐन दिवाळीत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

दिवाळी निमित्ताने तो शनिवारी गावी आला होता. त्याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंडकी येथे घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या युवकाने अचानक गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अक्षय मारुती घडशी २८, मांडकी-खांबेवाडी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घडशी कुटूंब हे नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने हा युवक पत्नी समवेत आपल्या सासुरवाडीत आबीटगाव येथे आला होता. त्यानंतर पत्नीला माहेरी सोडून तो आपल्या मूळगावी मंडकी येथे गेला होता. अक्षय हा मुंबई येथे महावितरण कार्यालयात नोकरी करत होता. दिवाळी निमित्ताने तो शनिवारी गावी आला होता. त्याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोमवारी सकाळी पत्नी त्याला मोबाईलवर कॉल करत होती, पण कॉल बराच वेळ करून देखील न उचलल्याने पत्नी मांडकी येथे सासरी आली, त्यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. दिवाळीसाठी म्हणून गावी आलेल्या तरुणाने असे टोकाचे पाऊल का उचलले ! तरुणाने घेतलेल्या या निर्णयामुळं गावामध्ये सणाच्या दिवसात शोककळा पसरली.

चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावच्या हद्दीजवळ ही घटना घडली आहे. तरुणाने ऐन दिवाळीतच एवढे टोकाचे पाउल उचलल्याने सणाच्या दिवशी कुटुंब दु:खात बुडाले. अक्षय याचे फेब्रुवारी महिन्यातच लग्न झाले होते. मांडकी येथे या नवविवाहित तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अक्षयचा स्वभाव हा जिद्दी व तापट होता, असं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. पण अक्षयने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकलेले नाही. या घटनेची नोंद चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सावर्डे पोलीस ठाण्याचे श्री गमरे करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular