21.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraआपत्ती प्रवण ६ जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

भविष्यात अशा स्वरूपाची आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास होमगार्ड व नागरी संरक्षण दल प्रशिक्षित व सुसज्य असणे गरजेचेच आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती खूपच गंभीर बनली होती. रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यात चक्रीवादळ, अतिवृष्टी पूरपरिस्थिती, भूस्खलन, इ. कारणाने खूप मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली होती. अनेकांची घरेच्या घरे वाहून गेली होतीत. भविष्यात अशा स्वरूपाची आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास होमगार्ड व नागरी संरक्षण दल प्रशिक्षित व सुसज्य असणे गरजेचेच आहे. त्यानुसार महासमादेशक होमगार्ड, डॉ. भुषणकुमार उपाध्याय, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, उप-महासमार्देशक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यामध्ये आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्डना दि. ९ मे ते दि. २० मे २०२२ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांचेशी समन्वय ठेवून संबंधित जिल्हा होमगार्ड कार्यालयांमार्फत देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,पालकमंत्री, आमदार, खासदार व अन्य प्रतिष्ठीत व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणार्थीना राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एसडीआरएफ) यांचे मार्फत उत्कृष्ठ दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्याच्या प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये निश्चितच भर पडणार आहे. होमगार्डचे उप-महासमादेशक यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून, नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज भासते. राज्यातील आपत्ती प्रवण ६ जिल्ह्यांमध्ये २०० होमगार्ड्सना पहिल्या टप्प्यात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular