22.1 C
Ratnagiri
Saturday, January 17, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeMaharashtraकोयना धरणात २४ तासात ६ टीएमसी पाण्याची वाढ

कोयना धरणात २४ तासात ६ टीएमसी पाण्याची वाढ

कोयना धरणात ७४ हजार ५६९ क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणसाठ्यात गेल्या २४ तासांत कोयना धरणात सहा टीएमसीने साठा वाढला आहे.

सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने कोयना धरणाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात धरणात ६ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. कोयनानगरमध्ये १६५ तर महाबळेश्वरला १५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे दरडी कोसळत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोयना धरणात ७४ हजार ५६९ क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणसाठ्यात गेल्या २४ तासांत कोयना धरणात सहा टीएमसीने साठा वाढला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात पश्चिमेला दमदार पावसाने हजेरी लावली असली, तरी पूर्वेकडे भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. दुष्काळी पट्ट्यात अजूनही टँकरने पाणीपुरवठ सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular