26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeChiplunकोकण पदवीधरसाठी ६३.३५ टक्के मतदान, निकालाची उत्सुकता

कोकण पदवीधरसाठी ६३.३५ टक्के मतदान, निकालाची उत्सुकता

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मतदान सुरू होते.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी (ता. २६) पाऊस असतानाही जिल्ह्यात पदवीधरांनी मतदानासाठी हजेरी लावली. जिल्ह्यात ३८ मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६३.३५ टक्के मतदान झाले. २२ हजार ६८१ पैकी १४ हजार ३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोकण पदवीधरसाठी ५९.३१ इतके मतदान झाले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होते. जिल्ह्यात ३८ मतदान केंद्रांवर जवळपास २२ हजार ६८१ मतदार आहेत.

सकाळच्या सत्रात मतदानाची तेवढी गर्दी नव्हती. मात्र, १० वाजल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज दिवसभर पाऊस असल्यामुळे मतदानावर परिणाम होईल, अशी शक्यता होती. मात्र, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी सकाळीच सपत्नीक तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. पावसाचा जोर जिल्ह्यात सर्वत्रच असला तरीही मतदारांचा उत्साह तेवढाच अधिक होता.

दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४९ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील १४ हजार ३६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यात ६३.३५ टक्के इतके मतदान झाले असून, कोकण पदवीधरमधून कोण निवडून येणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कीर हे रत्नागिरीतील असल्यामुळे येथील मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहणार का, याची उत्सुकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular