26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraठाण्यातील वृद्धाश्रमामध्ये ६७ जण कोरोना संक्रमित

ठाण्यातील वृद्धाश्रमामध्ये ६७ जण कोरोना संक्रमित

राज्यातील कोरोनाचे संक्रमण सध्याच्या स्थितीला संपुष्टात आले आहे. नव्या व्हेरीएंटची चर्चा सुरूच होत आहे . तोपर्यंत ठाणे जिल्ह्यातील खडवली वृद्धाश्रमातील ६७ वृद्धांना एकाच वेळी कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अचानक धडकलेल्या या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. २ वर्षाच्या कोरोनाच्या विळख्यानंतर आत्ता कुठे परिस्थती थोडी सुधारत होती तर पुन्हा हे प्रकरण समोर आले आहे. त्या सर्वांना तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. विशेष म्हणजे या सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणही पूर्ण झाले आहे.

या वृद्धाश्रमातील एका कर्मचाऱ्याच्या मुलीला ताप आल्यानंतर त्या कर्मचाऱ्यालाही थोडा ताप जाणवू लागला. त्यानंतर त्यांची तपासणी दरम्यान त्यांना कोरोनाचा प्रसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. एकाच वेळी ६७ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या एकूण ६७ जणांमध्ये एका लहान मुलासह ३९ पुरुष तर एका लहान मुलीसह २८ महिलांचा समावेश आहे. एकीकडे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेणारे अवघे चार ते पाच रुग्ण असतांना येथील कर्मचारी वर्ग काहीसे निवांत होण्याच्या मार्गावर होते. तर हि वृद्धाश्रमातील कोरोना संक्रमणाची बातमी आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, खडीवलीतून हे रुग्ण आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच रुग्णालय प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. एकत्रितरित्या एवढे रुग्ण दाखल होत असल्याने त्यांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करावी लागणार असल्याचे रुग्णालयामार्फत सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular