27.6 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeRatnagiriरत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

१७ ग्रॅम गांजा व मोटार असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली होती. काल रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून १७ ग्रॅम गांजा व मोटार असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या दरम्यान शहरातील नूतननगर येथे गांजा सेवन करणाऱ्या आणखी दोघांना अटक केली. पोलिसांच्या सलग दोन कारवाईमध्ये एकूण ७ जणांना अटक केली. शहर पोलिसांनी ही अधिकृत माहिती दिली. अमान नौशाद शेखासन (वय २६, रा. राहत अपार्टमेंट, रत्नागिरी), राज नितीन राऊत (२५, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी), कैफ होडेकर (२१, रा. भाट्ये, रत्नागिरी), दानिश मेहबूब मुल्ला (रा. आरोग्य मंदिर, रत्नागिरी) व मुसद्दीक म्हसकर (२२, रा. कर्ला रत्नागिरी), अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. शहर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांकडून संशयितांना गुरुवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

या वेळी संशयितांची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. तिघा संशयितांच्यावतीने अॅड. सुहेल शेख यांनी काम पाहिले. शहरालगतच्या भाट्ये येथे अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाकडून भाट्ये येथे गस्त घालण्यात येत होती. रात्री ८ च्या सुमारास भाट्ये येथील कोहिनूर हॉटेलकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एका गाडीमध्ये काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी लागेच छापा टाकून या ठिकाणी असलेल्या ५ तरुणांच्या मुसक्या आवळल्या. संशयित तरुणाच्या ताब्यातून पोलिसांनी १७ ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ व कार असा मिळून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दरम्यान, शहरातील नूतननगर ते सुरेशा पॉईंटकड़े जाणाऱ्या रस्त्यावर गांजा अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. तफहीम तन्वर मुजावर (२१, रा. इंफ्रा शाळेजवळ, नायाबनगर कोकणनगर, रत्नागिरी) आणि सफवान शफिक अल्जी (२१, रा. मुळ रा. केळ्ये, सध्या रा. सोलार ग्रीन, अजमेरीनगर, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना ३१ जुलैला रात्री साडेआठच्या सुमारास निदर्शनास आली. संशयित नूतननगर ते सुरेशा पॉईंटकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर झुडपांच्या आडोशाला गांजाचे सेवन करत होते. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलिस हेड कांस्टेबल आशीष भालेकर करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular