एनसीबी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी ०२/१०/२०२१ रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला. या ऑपरेशन दरम्यान गांजा, कोकेन, एमडी आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं असून त्यामध्ये दिल्लीतील दोन तरुणींचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा ९४/२१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एनसीबीच्या ताब्यात असलेले मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, गोमित चोप्रा, आर्यन खान, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, अरबाज मर्चंट यांची चौकशी सुरु आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेतलं असून, त्याला अटक होणार कि नाही यावर किला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला चौकशीसाठी ताब्यात ठेवण्यात आले असून, काल एक रात्र कोठडीत काढावी लागली आहे.
ड्रग्ज प्रकरणात क्रुझवरुन ताब्यात घेतलेल्या आर्यन खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आर्यन खानने चौकशी दरम्यान सांगितले कि, त्याला या क्रुझवर फक्त गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलवण्यात आलं होतं.
या हाय प्रोफाईल पार्टीमध्ये श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटींची हजेरी होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा समावेश होता. यात दोन तरुणींना देखील ताब्यात एनसीबीने घेतले आहे. सध्या एनसीबीच्या ताब्यात असलेल्या या दोन तरुणी मुनमुन धामेचा आणि नुपूर सारिका या दोन्ही तरुणी दिल्लीतील असून, केवळ या रेव्ह पार्टीसाठी तरुणी मुंबईत आल्या होत्या. दोघीही दिल्लीतल्या व्यापारी कुटुंबाशी संबधित आहेत. सध्या एनसीबी त्यांचीसुद्धा कसून चौकशी करत आहे.