25.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeSindhudurgशिरोडा समुद्रात भयावह हादसा, ८ पर्यटक बुडाले!

शिरोडा समुद्रात भयावह हादसा, ८ पर्यटक बुडाले!

तिघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक महिलेला वाचविण्यात यश आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेले आठ पर्यटक समुद्रात बेपत्ता झाले. आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बेळगाव येथील पर्यटक कुडाळ येथे नातेवाईकांकडे आले होते. तेथून ते शिरोडा वेळागर येथील समुद्रात पर्यटनासाठी आले. समुद्रात गेले असता हे आठ जण बेपत्ता झाले. यातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक महिलेला वाचविण्यात यश आले आहे. तर उर्वरित चार जणांचा समुद्रात शोध घेण्यात येत आहे. या पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले आहे. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे.

समुद्रातून बाहेर काढलेल्या पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे १. इसरा इम्रान कित्तर, वय वर्ष १७ रा. लोंढा, बेळगाव (वाचली आहे), २. श्रीमती फरहान इरफान कित्तर, वय ३४, रा. लोंढा, बेळगाव (मयत), ३. श्री इबाद इरफान कित्तर, वय १३ रा. लोंढा, बेळगाव (मयत), ४. श्रीमती नमीरा आफताब अख्तर वय १६, रा. अल्लावर, बेळगाव (मयत), बेपत्ता पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे १. इरफान मोहम्मद इसाक कित्तर, वय ३६ रा. लोंढा, बेळगाव, २. इक्वान इमरान कित्तर, वय १५ रा. लोंढा, बेळगावे, ३. फरहान मोहम्मद मणियार, वय २०, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, ४ जाकीर निसार मणियार वय १३, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular