अवेळी पडलेल्या पावस व बदलत्या हवामानाचा फटका या वर्षी हापूसला मोठ्याप्रमाणात बसल्याने आंबा पीक एकदम कमी आले होते. त्यात दिलासादायक बाब म्हणजे वाशी येथील निर्यात केंद्रातून यंदा ९७४ हून अधिक टन आंब्याची निर्यात झाली. त्यामध्ये अमेरिकेत सर्वाधिक ८०६ टन आंबा गेला असून, उत्पादकाला चांगला दर मिळाला आहे. यामध्ये हापूस ७० टक्के असून उर्वरित केसर, बैगनपल्ली या आंब्याचा समावेश आहे. यंदा कोकणातील हापूस कमी असल्यामुळे स्थानिक बाजारात दरही टिकून होते. त्यामूळे निर्यातीला आंबा कमी जाईल अशी शक्यता वर्तवली होती. त्यासाठी मंडळाकडून जास्तीत जास्त आंबा निर्यातीचे नियोजन केले होते. त्यासाठी मुंबईतील वाशीच्या निर्यात कमी जाईल अशी शक्यता वर्तवली होती.
त्यासाठी मंडळाकडून जास्तीत जास्त आंबा निर्यातीचे नियोजन केले होते. त्यासाठी मुंबईतील वाशीच्या निर्यात केंद्रातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. आवश्यक परवानग्याही वेळीच घेण्यात आल्या होत्या. अमेरीकेमधील निरीक्षकाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर एप्रिल महिन्यात निर्यातीला सुरूवात झाली. मे अखेरपर्यंत हापूसची निर्यात करण्यात यश मिळाले. मे महिन्यात अधिक निर्यात झाल्याचे पणनकडून सांगण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस निर्यातीचे प्रमाण वाढले आहे.
गतवर्षी ५७६ टन आंब्याची निर्यात झाली होती. यावर्षी ९७४.८९ टन इतकी निर्यात झाली, याला पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलींद जोशी यांनीही दुजोरा दिला. पणन मंडळाच्या वतीने वाशी येथे अत्याधुनिक निर्यात केंद्राची सुविधा निर्माण केली आहे. देशभरात उत्पादीत होणाऱ्या आंब्याची याठिकाणाहून निर्यात केली जात आहे. वाशी बाजारात येणाऱ्या आंब्यातील दर्जेदार आंबा निवडून निर्यात करण्यात येत असते.