26.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriयोगगुरू स्वामी रामदेव महाराज ९ मार्चला रत्नागिरीत, विविध कार्यक्रमांचे नियोजन

योगगुरू स्वामी रामदेव महाराज ९ मार्चला रत्नागिरीत, विविध कार्यक्रमांचे नियोजन

रत्नागिरीतून राष्ट्रीय पातळीवरील योग विज्ञान शिबिरांचा प्रारंभ स्वामी रामदेव महाराजांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

रत्नागिरीतून राष्ट्रीय पातळीवरील योग विज्ञान शिबिरांचा प्रारंभ स्वामी रामदेव महाराजांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. ८ मार्चला रामदेव महाराज रत्नागिरीत दाखल होणार असून ९ मार्चला पहाटे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महिला, पुरुष, विद्यार्थ्यांसाठी शिबिर होणार असल्याची माहिती भारत स्वाभीमान ट्रस्टचे राज्य प्रभारी बापूसाहेब पाडाळकर आणि महिला पतंजली राज्य प्रभारी सुधाताई अळ्ळीमोरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना नंतर मानसिक व शारीरिक बळ देण्याकरिता योगचे अनन्य साधारण महत्त्व आहे. शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेला महिला पतंजली योग समिती राज्य कार्यकारिणी सदस्य सौ. रमाताई जोग, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अॅड. विद्यानंद जोग यांच्यासह नगरसेविका शिल्पा सुर्वे व पतंजली समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मागील २० वर्षांपासून, हरिद्वार येथील पतंजली योगपिठाद्वारे स्वामी रामदेव महाराजांनी योगाचा देश-विदेशात योग शिबिरांद्वारे प्रसार केला. सध्या कोरोना काळ, सलग दोन वर्षे चक्रीवादळे, नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांच्या जीवनमान, व्याधीमुक्त करण्याकरिता योग विज्ञान शिबिर मोठ्या स्वरूपात घेण्यात येणार आहेत. रामदेव महाराज ८ मार्चला सायंकाळी ५ वाजता रत्नागिरीत येणार असून लोकमान्य टिळक जन्मस्थान आणि पतितपावन मंदिर, स्वा. वीर सावरकर स्मारकाला ते भेट देणार आहेत. ९ तारखेला पहाटे ५ वाजता योग शिबिराला सुरवात होईल.

याच दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आरोग्य सुधारक विषयक टिप्स,  मुलांवर चांगले संस्कार व आनंदी निरोगी परिवार या त्रिसूत्रीय विषयांचे मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी ९ ते १२ या वेळेमध्ये स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular