27.6 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraत्यांना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का !

त्यांना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का !

आज तरी गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत. उद्या जनमाणसाचा विचार करू. शिंदे यांच्या विद्वत्तेबाबत संशोधन करावं लागेल.

शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. आम्हाला निवडणुक आयोगाला आमची निष्ठा दाखवायची आहे. म्हणून आम्ही प्रतिज्ञापत्र लिहून देणार आहोत. आज तरी गद्दारांना शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत. उद्या जनमाणसाचा विचार करू. शिंदे यांच्या विद्वत्तेबाबत संशोधन करावं लागेल. कुणी तरी लिहून द्यायचे आणि त्यांनी ट्विट करायचे हे आम्हाला माहीत नाही का? त्यांना स्वत:च्या हाताने ट्विट तरी करता येतं का? मला त्यांच्या विद्वत्तेचा अभ्यास करावा लागेल, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

आमदारकीसाठी एकनाथ शिंदे यांचे नावं पुढे करणे ही माझी चूक होती. चुकांसाठी आम्ही जबाबदार आहोत, उद्धव ठाकरे नाहीत, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. खासदार विनायक राऊत तीन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

राजकारणामध्ये झालेली उलथापालथ, एका रात्रीत बदलेलेल राजकारण आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांची खरेदी विक्री करण्यात आली. चाळीस हून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, नगरसेवक शिंदे गटामध्ये सामील झाले. तर काही लोक आपलं मंत्रिपद टिकवण्यासाठी शिंदेंसोबत गेले, असा खोचक टोला राऊत यांनी उदय सामंत यांना नाव न घेता थेट लगावला. काही शिवसैनिकांनी तुम्ही कुठेही जा, आम्ही सेनेतच राहणार आहोत, असं सामंत यांच्या घरी जाऊन सांगितल्याचेही राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular