25.9 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeKhed"ही" मागणी पावसाळ्यात कोणाचा जीव गेल्यावर पूर्ण होणार का? संतप्त ग्रामस्थ

“ही” मागणी पावसाळ्यात कोणाचा जीव गेल्यावर पूर्ण होणार का? संतप्त ग्रामस्थ

धनगरवाडीतील १२ शाळकरी मुलाना शाळेत जाण्यासाठी पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत एक प्रकारे कसरत करताना जावे लागत आहे.

कोकणात सध्या पावसाचा जोर वाढतच आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण खेडमध्ये सर्वत्र नद्यांची पातळी वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे सुद्धा शिक्षणासाठी हाल होत आहेत. खेड तालुक्यातील धनगरवाडी नांदीवली या गावात शिक्षणासाठी भर पावसामध्ये ओढ्यातून शाळकरी मुलांना प्रवास करावा लागत आहे. धनगरवाडीतील १२ शाळकरी मुलाना शाळेत जाण्यासाठी पाण्याच्या ओढ्यातून वाट काढत एक प्रकारे कसरत करताना जावे लागत आहे.

नांदीवली दंडवाडी गावातील धनगरवाडीतील १२ मुले रोज शाळेत जाण्यासाठी अशी कसरत करून प्रवास करताना दिसतात. शाळेत जातांना रस्त्यात असणारा ढेबेवाडीचा ओढा पार करुन पलीकडे शाळेत जावे लागते. सध्या हा ओढा पाण्याने संपूर्ण भरला असून पाण्याला जोर सुद्धा गतीमान आहे. आणि त्यातूनच या चिमुकल्या विद्यांर्थ्यांचा रोजचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. दरम्यान या ओढ्यावर लोखंडी साकव बांधण्यात यावा अशी कित्येक दिवसांपासून ग्रामस्थांची मागणी आहे. पण अद्यापही या मागणीवर शासनाने लक्ष दिलेले नाही. ही मागणी पावसाळ्यात कोणाचा जीव गेल्यावर पूर्ण होणार का?  अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पावसाळयात येथील नागरिकांना बाजारहाट तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा गाठायची म्हटली तरी त्यांच्यासमोर पेच निर्माण होतो. जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळेमधील विद्यार्थ्यांना भर पावसात ओढे पार करण्यासाठी पावसाळयात पालकांसमोर नेहमीचा यक्ष प्रश्न निर्माण होतो. या महत्त्वपूर्ण समस्येकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतेय, असा आरोप नागरिक करत आहेत. धनगरवाडी नांदीवली या भागातील ग्रामस्थांनी पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळयात मुलांना शाळेत पाठविणे धोकादायक असल्याने पूल लवकरात लवकर बांधावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular