25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeTechnologyगुगलने भरती कमी करण्याचा घेतला निर्णय - सुंदर पिचाई

गुगलने भरती कमी करण्याचा घेतला निर्णय – सुंदर पिचाई

सुंदर पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिले की, “इतर कंपन्यांप्रमाणे आम्हीही आर्थिक संकटांपासून अस्पर्शित नाही.

पुढच्या वर्षी जगात मंदी येईल की नाही, पण त्याची भीती बड्या टेक कंपन्यांमध्ये दिसू लागली आहे. मेटा नंतर आता गुगलने भरती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. कंपनी भरतीचा वेग कमी करेल, असे पिचाई यांनी म्हटले आहे. अत्यावश्यक सेवांसाठी भरती सुरू राहणार आहे. ईमेलमध्ये म्हटले आहे की २०२२ आणि २०२३ मध्ये कंपनीचे लक्ष केवळ अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विश्लेषण आणि विशिष्ट पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्यावर आहे.

२०२२ च्या पहिल्या भागात कंपनीने कर्मचाऱ्यांच्या भरतीचा कोटा पूर्ण केला आहे. पिचाई यांनी लिहिले आहे की, इतर कंपन्यांप्रमाणे आम्हीही आर्थिक परिणामापासून अस्पर्श राहणार नाही. आम्ही दुसऱ्या तिमाहीतच Google मध्ये १०,००० कर्मचारी जोडले. या वर्षीचे भरतीचे उद्दिष्ट आम्ही जवळपास गाठले आहे. त्यामुळे उर्वरित दिवस आम्ही भरती प्रक्रिया मंद करत आहोत. पिचाई यांच्या ईमेलवरून हे स्पष्ट झाले आहे की गुगल देखील आता आर्थिक मंदी पाहत आहे.

पिचाई म्हणाले की २०२२ आणि २३ मध्ये कंपनीचे लक्ष अभियांत्रिकी, तांत्रिक आणि इतर अत्यावश्यक सेवांमध्ये कर्मचारी भरती करण्यावर असेल. पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिले की, दुसऱ्या तिमाहीतच आम्ही दहा हजार कर्मचारी गुगलमध्ये जोडले आहेत.

सुंदर पिचाई यांनी ईमेलमध्ये लिहिले की, “इतर कंपन्यांप्रमाणे आम्हीही आर्थिक संकटांपासून अस्पर्शित नाही. आपण अनिश्चित जागतिक आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. अशा आव्हानांना आपण नेहमीच अडथळे म्हणून नव्हे तर संधी म्हणून पाहिले आहे. आपण सध्याच्या परिस्थितीचे संधींमध्ये रूपांतर करू.

RELATED ARTICLES

Most Popular