23.5 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriविषारी सर्प दंशाने महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू

विषारी सर्प दंशाने महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू

गवतात बसलेल्या सापावर त्यांचा नजरचुकीने पाय पडला आणि आजूबाजूला नेमकं त्यावेळेला कोणीही नसल्याने काही क्षणातच होत्याच नव्हत झाले.

कोकणामध्ये सध्या पावसाने चांगलीच हजेरी लावली असून शेतीच्या कामांची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात शेतीच काम करत असताना एक वेगळा प्रकार समोर आला आहे. शेतात वाढलेले गवत काढण्याचे काम करत असताना दबा धरुन बसलेल्या विषारी सापावर महिलेचा पाय पडल्याने तिला सापाने दंश केल्याने, ५९ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यात मुंढर गावात घडली आहे.

प्रभावती प्रकाश मोहित असे या मृत महिलेचे नाव आहे. या आपल्या घराशेजारी असणाऱ्या शेतात गवत काढत होत्या. याचवेळी गवतात बसलेल्या सापावर त्यांचा नजरचुकीने पाय पडला आणि आजूबाजूला नेमकं त्यावेळेला कोणीही नसल्याने काही क्षणातच होत्याच नव्हत झाले. सापाने पायाला दंश करताच या महिलेने आरडाओरडा केला. पण बाजूच्या परिसरात कोणीच नसल्याने हा साप सापडला नाही.

ही महिला तत्काळ घरी आली आणि तत्काळ तिने शेजाऱ्यांना साप चावल्याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून या दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ सुरू केली. पण त्यांना वेळेत कोणतेही वाहन मिळाले नाही. यामध्ये वेळ गेला, थोड्या वेळाने वाहन मिळताच ग्रामस्थांनी वाहनातून तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत होते पण वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच या महिलेचा वाहनामध्येच मृत्यू झाला. गुहागर पोलिसांनी तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात या घटनेचा पंचनामा केला.

या महिलेल्या कोणत्या विषारी जातीच्या सापाने दंश केला हे समजू शकलेले नसले तरी या महिलेला कांडर जातीचा साप चावला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सगळ्या दुर्दैवी धक्कादायक प्रकाराने मुंढर वळवणवाडी परिसर शोकाकुल झाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular