26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeRatnagiriगणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेगाड्याना स्पेशल भाडे आकारणी, चाकरमानी नाराज

गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेगाड्याना स्पेशल भाडे आकारणी, चाकरमानी नाराज

अनियमित धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांपेक्षा ३० टक्के अधिक तिकिट दर असणार आहे.

गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी तब्बल १७२ विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. यातील २४ फेर्‍यांना स्पेशल भाडे आकारणी होणार असून अनियमित धावणार्‍या एक्सप्रेस गाड्यांपेक्षा ३० टक्के अधिक तिकिट दर असणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर या वर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी विशेष एक्सप्रेस गाड्यांचे नियोजन केले आहे या सर्वच गाड्यांचे बुकींगदेखील सुरू झाले असुन २० ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंतच्या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. परतीच्या ३ ते १० सप्टेंबरपर्यंच्याही गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाले आहे.

गणेशोत्सवातील विशेष गाड्यांमधील २४ गाड्यांना रेल्वे प्रशासनाने विशेष आणि जादा भाडे आकारणी केली आहे. यामध्ये मुंबई सेंट्रल ते ठोकूर, मुंबई सेंट्रल ते मडगांव, बांद्रा ते कुडाळ, उधना ते मडगांव, कुडाळ ते अहमदाबाद या गाड्यांचा समावेश आहे. या स्पेशल भाडे असलेल्या गाड्यांचे आरक्षण १८ जुलैला सुरू झाले. या गाडयांनाही चाकरमान्यांकडून प्रथम पसंती राहिली असुन आरक्षणही काही कालावधीतच फुल्ल झाले आहे.

कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणार्‍या कोकणकन्या, मांडवी, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस आदी गाड्यांना मुंबई ते कणकवलीपर्यंतच्या स्लिपर श्रेणीतील प्रवासासाठी ३३५ ते ३४० रूपयांची तिकिट आकारणी होते. मात्र स्पेशल भाडे असलेल्या गाड्यांना मुंबई ते कणकवली या स्लिपर श्रेणीतील प्रवासासाठी ४३० रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे शासनाने दिलेल्या सुविधांमध्ये अशा प्रकारची वाढ हि जनतेला अनपेक्षित होती.

RELATED ARTICLES

Most Popular