24.8 C
Ratnagiri
Monday, November 24, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraतेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण !

तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण !

शिवसेना आणि शिंदे गटात 'करा किंवा मरा' ची स्थिती झालेली असतानाच आता उद्धव ठाकरे एक मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

मागील काही दिवसात उद्धव ठाकरेंना सोडावं लागलेलं मुख्यमंत्रीपद, त्यानंतर शिवसेनेत होत असलेली बंडाळी आणि आमदार, खासदार यांनी ठाकरे आणि शिवसेनेविरोधात जाऊन पक्षाविरोधात घेतलेली भूमिका पाहता शिवसेना सध्या एक पाऊल पाठी आल्याचं दिसत आहे. मात्र आता पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरेंचे दुसरे पुत्र तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होणार असल्याचे समजते आहे.

शिवसेनेतील ठाण्याचे जुने आणि मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. राज्यातील अनेक स्थानिक पातळीवरील शिवसेना नेत्यांनी शिंदेंच्या पाठिंशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता शिवसेनेला मोठी गळती लागली असल्याचे चित्र असून शिवसेना आणि शिंदे गटात सुप्रीम कोर्टात, राजकारणात आणि रस्त्यावर मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि शिंदे गटात ‘करा किंवा मरा’ ची स्थिती झालेली असतानाच आता उद्धव ठाकरे एक मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. परंतु, अद्याप त्याचा काहीच उलगडा केला नसल्याने विविध तर्कवितर्कांना ऊत येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात तेजस ठाकरे पक्षाचे संकटमोचक बनतील का?, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. आता कोल्हापूरातील शिवसेनेच्या एका सार्वजिक कार्यक्रमात तेजस ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीचं दर्शनदेखील घेतलं. त्यानंतर ते राजकारणात येणार, अशा चर्चांना उधाण आलं. तेजस ठाकरेंनी याआधी कधीही शिवसेनेच्या सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नव्हती, याशिवाय ते शिवसेनेच्या कुठल्याही संघटनात्मक पदावर काम करत नव्हते. मात्र तेजस ठाकरे यांच्या एन्ट्रीबाबत शिवसैनिकांनाही उत्सुकता असल्याचे राज्यात चित्र आहे.

RELATED ARTICLES

Most Popular