27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeRatnagiriजिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी, शासनाचा सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी, शासनाचा सतर्कतेचा इशारा

जगबुडी, काजळी, शास्त्री, कोदवली, बावनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. जगबुडी, काजळी, शास्त्री, कोदवली, बावनदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदेराई बाजारपेठ इथे पाणी आले असून खेड मटण आणि मच्छी मार्केटजवळ पाणी आले आहे.

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरले व संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली. काल सकाळी ९ वाजता बाजारपेठेत शिरलेले पाणी आज दिनांक ९ ऑगस्ट ला सकाळी ९ वाजेपर्यंत म्हणजे २४ तास पाणी बाजारपेठेत होते.

चांदेराई सहित हरचेरी, सोमेश्वर , तोणदे , हातीस या भागात पुराचे पाणी शिरले होते. काल रात्री पासून विद्युत प्रवाह देखील खंडित झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरचा चिखल दूर करण्यासाठी जरूर ती उपाय योजना करावी व या घटनेचे तात्काळ पंचनामे करून पूरग्रस्तांना तात्काळ शासनाने मदत द्यावी अशी आग्रही मागणी  चांदेराई चे माजी सरपंच दादा दळी यांनी केली आहे.

पुराच्या पाण्याने राजापूरमधील जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला वेढा दिला आहे. राजापूर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जवाहर चौक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. राजापूर शिळ चिखलगाव रस्ता, तर शहरातील बंदरधक्का व शिवाजीपथ रस्ता पाण्याखाली गेला आहे.

लांजाजवळ असलेल्या काजळी नदीने धोका पातळी ओलांडली असून पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने सगळेच ठप्प झाले आहे. येथील श्री दत्त मंदिरही पाण्याखाली गेले आहे. मुंबई-गोवा महामार्गवरील वाहतूक पोलीस आणि लांजा पोलीस पथकाच्या उपस्थितीत अंजनारी पुलावरून दोन्ही बाजूने वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. लाटवण रेवतळे पुलावर पाणी आल्याने दापोली मंडणगड लाटवण महाड रस्ता बंद झाला आहे. खेड नगरपरिषदेकडुम शहरत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंडणगड भिंगळोली येथील समर्थ कृपा अपार्टमेंट येथील वसाहतीत पाणी भरले आहे. मंडणगड भिंगळोली सृष्टी अपार्टमेंट इथे पुराचे पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, मंडणगड तालुक्यात अंबवणे इथे वाहतूक बंद झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular