29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

दापोलीतील सुवर्णदुर्ग वारसास्थळात शिवरायांच्या किल्ल्यांना जगाचा मुजरा

आक्रमकांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मराठी रयतेला आणि मनांना...

बसरा स्टार जहाज पाच वर्षांनंतर भंगारात, दोन कोटींत व्यवहार

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर...

गुरूपौर्णिमेहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला तिघांचा मृत्यू

गुरूवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक-मुंबई महामार्गावरील...
HomeMaharashtraशरद पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना “हा” विशेष सल्ला

शरद पवारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना “हा” विशेष सल्ला

धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह अशाप्रकारे काढून घेणे योग्य नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. या विस्तारानंतर आता कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते दिले जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर खातेवाटपाबाबत विविध प्रसारमाध्यमांकडून अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व अंदाज पूर्णपणे चुकणार असल्याचा दावा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी अखेर भाष्य केले आहे. ते बुधवारी बारामतीमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. त्यांनी एकनाथ शिंदे  यांना एक सल्ला देऊ केला आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह अशाप्रकारे काढून घेणे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेस मधून बाहेर पडलो तेव्हा वेगळा पक्ष काढला, वेगळं चिन्ह घेतलं. मी काँग्रेस पक्षाचं चिन्हं मागितलं नाही. त्याच्यातून वादविवाद वाढवणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्त्वात नव्हता. आज तो कायदा अस्तित्त्वात आहे. आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांना खातेवाटपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी गुगली टाकली. ‘खातेवाटप तर माध्यमांनीच करून टाकलं आहे. आता आमच्यासाठी खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही.

RELATED ARTICLES

Most Popular