29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कन्या एक्स्प्रेसमध्ये तरुणीचा धिंगाणा, प्रवासी हैराण

कोकण रेल्वेमधील एसी डब्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या...

दुर्गम भागासाठी हवी स्वतंत्र संचमान्यता – मुख्याध्यापक संघाची मागणी

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयामुळे...

वाढत्या समस्यांनी रत्नागिरीकर त्रस्त, शहराच्या दुरवस्थेबाबत भाजप आक्रमक

शहरातील खड्डेमय रस्ते, अनियमित पाणीपुरवठा, गटारांची खराब...
HomeInternationalचीनमध्ये आढळून आला आणखी एक नवीन विषाणू

चीनमध्ये आढळून आला आणखी एक नवीन विषाणू

या विषाणूच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा, भूक न लागणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि मळमळ यांचा समावेश आहे

चीनमध्ये तीन वर्षांपूर्वी कोरोना विषाणू आढळल्यानंतर आता येथे आणखी एक नवीन विषाणू आढळून आला आहे. लांग्या हेनिपा वायरस असे त्याचे नाव आहे. त्यामुळे चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतात ३५ लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. हा व्हायरस हेंड्रा आणि निपाह व्हायरसशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.

नुकतेच प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या आणि ताप आलेल्या लोकांच्या नियमित तपासणीत हा विषाणू प्रथम आढळला. व्हायरसची पुष्टी झाल्यानंतर, संपर्कात आलेल्या इतर लोकांचीही चौकशी केली जात आहे. सायन्स अलर्टच्या अहवालानुसार, या विषाणूच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, थकवा, भूक न लागणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि मळमळ यांचा समावेश आहे. गंभीर आजारी लोकांमध्ये न्यूमोनिया आणि यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये असामान्यता देखील दिसून आली. रुग्णांच्या मृत्यूचे कोणतेही वृत्त नाही.

संशोधकांच्या मते, पाळीव प्राण्यांची तपासणी केल्यानंतर, विषाणूची २% प्रकरणे शेळ्यांमध्ये आणि ५% कुत्र्यांमध्ये आढळली आहेत. त्याच वेळी,  २५ वन्य प्राण्यांच्या प्रजातींपैकी, हा विषाणू जंगली घुशीमध्ये ओळखला गेला. त्यामुळे हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लांग्याहेनिपा विषाणू हेंड्रा आणि निपाह व्हायरसशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. हे दोन्ही विषाणू माणसांमध्ये पसरतात. १९९४ मध्ये क्वीन्सलँडमध्ये हेन्ड्रा व्हायरस पहिल्यांदा आढळला होता. त्यावेळी १४ घोडे आणि त्यांच्या प्रशिक्षकाचा संसर्गामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १०० हून अधिक घोडे आणि अनेकांना जीव गमवावा लागला आहे. भारतात देखील निपाह व्हायरस जीवघेणा ठरला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार, ४०-७५% प्रकरणांमध्ये रुग्णांचा मृत्यू ओढावू शकतो.

RELATED ARTICLES

Most Popular