27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriकाल आज व उद्या आमची निष्ठा कायम मातोश्री चरणी – आम. राजन...

काल आज व उद्या आमची निष्ठा कायम मातोश्री चरणी – आम. राजन साळवी

पुढच्या काही तासात आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करुन उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देतील, असे वृत्त समोर आलं होतं.

कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास व्यक्तीची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. पुढच्या काही तासात आमदार राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करुन उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देतील, असे वृत्त समोर आलं होतं. मात्र या वृत्तावर त्यांनी स्वतः खुलासा करुन सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ठाकरे सोबत राहणार की शिंदेकडे जाणार? या प्रश्नाचं उघड उघड आणि सडेतोड उत्तर देत विनाकारण अफवा पसरवत असल्याबाबत विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.

आमदार राजन साळवी यांनी प्रत्युत्तरादाखल दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरें सोबतचा फोटो जोडला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी… काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… असं म्हटलं आहे. या ट्विटनंतर काही वेळातच राजन साळवी यांनी दुसरं ट्विट केलं. निष्ठेचे प्रमाणपत्र दि. १५ ऑक्टोबर २००२ साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले, मला खोक्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे ५५ पैकी ४० आमदार घेऊन गेल्यानंतर ४१ वा आमदारही शिंदेकडे जायच्या तयारीत असल्याचे वृत्त व्हायरल होऊ लागल्याने, शिंदेंकडे जाणारा हा आमदार कोकणातील असल्याचं चर्चा  होऊ लागलं. त्यामुळे शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या नावावरुन कुजबूज सुरु झाली. आता स्वत: त्यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण देत आपली निष्ठा मातोश्री चरणी कायम असल्याचे म्हटत विरोधकांची बोलती बंद केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular