26.9 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeDapoliअमृता फडणवीसांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्सबाबत कारवाईची मागणी

अमृता फडणवीसांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्सबाबत कारवाईची मागणी

मनात लाज उत्पन्न होऊन "विनयभंग होईल अशा पद्धतीची ही पोस्ट दिसून येत आहे

संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी कलाकारांनी हजेरी लावून चाहत्यांचा जोश वाढवला होता. अशाच एका दहीहंडी उत्सवाच्या पुण्यातील कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या बातमी संदर्भातील पोस्ट एका प्रसिद्ध दैनिकाच्या फेसबुकपेजवर अपलोड करण्यात आली होती.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील कमेंट्स करत लज्जा उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह कमेंट्स केल्याबद्दल दापोलीत उद्धव ठाकरे गटाचे युवा शहरप्रमुख प्रसाद रंजना रमण दरीपकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार भाजपचे दापोली शहराध्यक्ष संदीप सुधाकर केळकर यांनी दापोली पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. या प्रकारानंतर दापोलीत एकच खळबळ उडाली आहे.

फेसबूक पेजवर करण्यात आलेल्या या पोस्टवर अनेक नागरिकांच्या प्रतिक्रियांच्या वेगवेगळ्या पोस्ट दिसून येत आहेत. यातील दापोली तालुक्यातील शहरातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रसाद रंजना रमण दरीपकर या नावाने फेसबुक अकाउंट असलेल्या व्यक्तीने अमृता फडणवीस यांच्याबद्दल अश्लील, महिलांबद्दल सार्वजनिक लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीचे आक्षेपार्ह वाक्य उच्चारून पोस्ट करण्यात आलेले आहे. ही प्रतिक्रिया आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

भाजपचे दापोली शहराध्यक्ष संदीप सुधाकर केळकर यांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे कि, या युवकावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मनात लाज उत्पन्न होऊन “विनयभंग होईल अशा पद्धतीची ही पोस्ट दिसून येत आहे त्यामुळे अशा माथेफिरू युवकावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular