27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeRatnagiriएसटीला खाजगी बसची धडक, खाजगी बस चालकाचे पलायन

एसटीला खाजगी बसची धडक, खाजगी बस चालकाचे पलायन

गुहागर तालुक्यामध्ये उमराठ घाडेवाडी आणि मराठवाडीतील चाकरमान्यांनी गावी येण्यासाठी बोरिवली आगारातून एस.टी. आरक्षित केली होती.

गणेशोत्सव उद्यावर आल्याने सध्या संपूर्ण कोकणात चाकरमान्याची एन्ट्री होऊ लागली आहे.  गुहागर तालुक्यामध्ये उमराठ घाडेवाडी आणि मराठवाडीतील चाकरमान्यांनी गावी येण्यासाठी बोरिवली आगारातून एस.टी. आरक्षित केली होती. रविवारी सायंकाळी जत डेपोची एसटी क्र. एमएच.११ बीएल ९३७८ नालासोपारा डेपोतून सुटली. बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव, बांद्रा कलानगर, जोगेश्र्वरी, सांताक्रुझ येथून ६ लहान मुलांसह ४२ गणेशभक्तांना घेवून ही एस.टी. गुहागरकडे रवाना झाली.

मार्गताम्हाणेमधून बोऱ्या जामसुदमार्गे उमराठकडे ही बस मार्गस्थ होती. सोमवारी सकाळी ७.१५ वाजता जामसूद पिंपरच्या सीमेवर एस.टी. आली असता, अरुंद रस्त्यावरुन भरधाव वेगाने मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बस क्र. एमएच ०४ जेयू ८२८० ने एस.टी.ला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर खासगी बसच्या चालकाने अपघात स्थळावरुन गाडीसह पलायन केले.

या धडकेमध्ये एसटीमधील १६ गणेशभक्तांसह ३ लहान मुले जखमी झाली. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. यामधील निता आग्रे, संदिप पवार, आनंदा बसणकर या प्रवाशांना ओठात दात घुसून मोठी जखम झाल्याने अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेने हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच प्रशासनासह विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हेदवीत अपघातग्रस्तांची भेट घेतली.

हेदवीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत कदम आणि त्यांच्या टीमने जखमींवर तत्काळ उपचार केले. अपघाताचे वृत्त कळताच गुहागर आगराचे व्यवस्थापक वैभव पवार, कर्मचारी संदिप वैद्य, तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, माजी जि.प. सदस्या सौ. नेत्रा ठाकूर, वेळणेश्र्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर यांनी हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून जखमींची चौकशी केली. या अपघातानंतर गुहागर एस.टी. आगाराचे व्यवस्थापकांनी वरिष्ठांशी चर्चा करुन तातडीने प्रत्येक जखमी गणेशभक्ताला ५०० रुपयांची तत्काळ मदत केली. एस.टी.च्या या निर्णयाबद्दल उमराठमधील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular