27.2 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeEntertainmentतो क्षण मी कधीही विसरु शकणार नाही, आगामी ऑस्करच्या ॲकरिंगसाठी ख्रिस रॉकचा...

तो क्षण मी कधीही विसरु शकणार नाही, आगामी ऑस्करच्या ॲकरिंगसाठी ख्रिस रॉकचा नकार

मला पुढील वर्षी ऑस्करच्या सोहळ्याचे अँकरिंग करणार का अशी विचारणा करण्यात आली होती.

एका कॉमेडी शोमध्ये झालेल्या ख्रिसनं याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात सहभागी झालेल्या प्रेक्षकांना तो म्हणाला, मला पुढील वर्षी ऑस्करच्या सोहळ्याचे अँकरिंग करणार का अशी विचारणा करण्यात आली होती. मात्र मी त्यांना नकार कळवला आहे. त्या रात्री जे झालं हे मी कधीही विसरु शकणार नाही. असं ख्रिसनं म्हटलं आहे.

जगप्रसिद्ध ऑस्कर सोहळ्यात झालेल्या त्या प्रकारानं साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. ९४ व्या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथनं निवेदक ख्रिसच्या कानशीलात लगावली होती. कारण होतं त्यानं विलच्या पत्नीची केलेली थट्टा. त्यावरुन संतापलेल्या विलनं साऱ्या प्रेक्षकांसमोर ख्रिसला फटकारलं, शिवीगाळ केली. त्यानंतर सोशल मीडियावरुन विलच्या त्या कृतीचा निषेध करण्यात आला होता.

साधारण पाच महिन्यांपूर्वी झालेल्या त्या ऑस्कर सोहळ्यानं मनोरंजन जगतात खळबळ उडाली होती. विलच्या रागाचा पारा चढला. त्यानं सर्व प्रेक्षकांसमोर स्टेजवर जाऊन ख्रिसच्या थोबाडात मारली होती. कालांतरानं त्याला आपल्या कृतीचा चांगलाच पश्चाताप झाला. चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानं ख्रिसच्या घरच्यांची माफीही मागितली. ख्रिसची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावरुन विलच्या त्या कृतीचा निषेध करण्यात आला होता. त्याच्यावर आता ऑस्कर समितीनं सोहळ्यात सहभागी होण्यावर बंदीही घातली आहे. विलने ऑस्करच्या समितीला देखील पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र ऑस्कर समितीनं आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा विचार केला आहे.

ख्रिसला आगामी ऑस्कर सोहळ्यात निवेदन करणार का अशी विचारणा करण्यात आली होती.या सगळ्यात ख्रिसनं आपण ऑस्करच्या सोहळयाचे होस्टिंग करण्यास नकार कळवला आहे. त्याच्या या निर्णयानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याला अँकरिंग करण्यास आग्रह केला जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular