27.5 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...

जिल्ह्यात रंगणार गुरू विरुद्ध शिष्य लढत तटकरे-सामंत आमनेसामने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या...

रघुवीर घाटात पुन्हा कोसळली दरड…

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, आज दिवसभर...
HomeIndiaभारतीय बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस विक्रांतचा नवा ध्वज

भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका आयएनएस विक्रांतचा नवा ध्वज

आज मी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती वीर शिवाजी महाराजांना समर्पित करतो, असे मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतीय सुरक्षा दलांनी ब्रिटीशकालीन ध्वजच पुढे ठेवले होते. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी पहिल्यांदा या ध्वजामध्ये बदल झाले. त्यामध्ये युनियन जॅकऐवजी तिरंगा लावण्यात आला होता. सेंट जॉर्ज यांचा रेड क्रॉस मात्र तसाच होता. त्यानंतर ठराविक काळानंतर दोनवेळा या ध्वजात बदल करण्यात आले. २०१४ मध्ये या ध्वजामध्ये सत्यमेव जयते ही ओळही लिहिण्यात आली होती.

भारतीय नौदलाला नवीन नौदल ध्वज मिळाला. यापूर्वी त्यावर रेड क्रॉसचे चिन्ह होते. तो काढण्यात आला आहे. आता डावीकडे तिरंगा आणि उजवीकडे अशोक चक्र चिन्ह आहे. त्याच्या खाली लिहिले आहे – शाम नो वरुण: म्हणजे वरुण आपल्यासाठी शुभ आहे. आज मी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती वीर शिवाजी महाराजांना समर्पित करतो, असे मोदी म्हणाले. आतापर्यंत नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीचे चित्र होते. आम्ही हे चित्र काढले आहे. शिवरायांच्या सागरी सामर्थ्याने शत्रू हादरले.

संरक्षण क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांचे आयएनएस विक्रांत हे उदाहरण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आज भारत अशा देशांच्या यादीत सामील झाला आहे जे त्यांच्या तंत्रज्ञानाने एवढी मोठी जहाजे बनवू शकतात.

पंतप्रधान म्हणाले की, आज आपल्याला नौदलाचा नवा ध्वजही मिळाला आहे. यामध्ये इंग्रजांचा सेंट जॉर्ज क्रॉस काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोधचिन्हाचा समावेश करण्यात आला आहे. नौदलाकडे अशीच एक युद्धनौका आहे, जी स्वतः एक तरंगते एअरफील्ड आणि शहर आहे. त्यावर निर्माण होणाऱ्या विजेने ५ हजार घरे उजळून निघू शकतात आणि केबल वायर्स कोचीपासून सुरू झाल्यास कन्याकुमारीपर्यंत जाऊ शकतात.

RELATED ARTICLES

Most Popular