26.5 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeMaharashtraआता नाही चालणार असे ! वाहतूक पोलिसांना विशेष नियम जारी

आता नाही चालणार असे ! वाहतूक पोलिसांना विशेष नियम जारी

तसेच जे पोलीस अधिकारी आणि अंमलदार स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

वाहनचालकांवर कारवाई करताना फोटो किंवा व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी स्वतःचा खासगी मोबाईलचा वापर न करता फक्त ई-चलान मशिनचाच वापर करावा, असे आदेश राज्य वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सारंगल यांनी वाहतूक पोलिसांना जारी केले आहेत. तसेच जे पोलीस अधिकारी आणि अंमलदार स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर करतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

बेशिस्तपणे वाहन चालवून अथवा रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी अथवा वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहन पार्क केलेलं असेल तर अशा वाहनांचे फोटो पाठवल्यास बक्षीस मिळेल. अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण गाड्यांचे फोटो काढून संबंधित मेल आयडी वर पाठवत होते. परंतु, अशा प्रकारच्या फोटोवर अनेक वाहनचालकांनी आक्षेप घेतल्याने हा निर्णय बदलण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक पाटील यांच्या १८ ऑगस्टच्या तक्रार अर्जानुसार सारंगल यांनी नव्याने आदेश दिले आहेत. यात कसूरदार वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी पोलीस स्वतःच्या खासगी मोबाईलचा वापर करतात.

मोबाईलवर केलेले चित्रण काही कालावधीनंतर ई चलान मशिनमध्ये अपलोड करतात. यात गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचा फोटो टाकतात. त्यामुळे गाडी कोणती आहे, हे ओळखणे अशक्य होत असल्याच्या आशयाचा तक्रार अर्ज करण्यात आला आहे. वाहन चालकांवर कारवाई करताना ई चलान मशिनव्दारेच सर्व कारवाई केली जाईल याबाबत खबरदारी घ्यावी. मार्च २०२० रोजी राज्यातील सर्व घटक प्रमुख आणि नोडल अधिकार्‍यांना आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता पून्हा नव्याने हे आदेश देण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular